समांथाच्या शरीरावरील नागा चैतन्यचा टॅटू गायब, पॅचअपच्या चर्चांना अभिनेत्रीकडून पूर्णविराम?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 04:18 PM2023-10-11T16:18:31+5:302023-10-11T16:19:52+5:30

समांथा आणि तिचा एक्स पती नागा चैतन्यमध्ये पुन्हा पॅच अप होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच समांथाने नागा चैतन्यच्या नावाचा टॅटू काढून टाकला आहे. 

samantha rukh prabhu removed tattoo of ex husband naga chaitanya | समांथाच्या शरीरावरील नागा चैतन्यचा टॅटू गायब, पॅचअपच्या चर्चांना अभिनेत्रीकडून पूर्णविराम?

समांथाच्या शरीरावरील नागा चैतन्यचा टॅटू गायब, पॅचअपच्या चर्चांना अभिनेत्रीकडून पूर्णविराम?

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. समांथा आणि तिचा एक्स पती नागा चैतन्यमध्ये पुन्हा पॅच अप होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नागाचैतन्य आणि समांथाने एका फ्रेंचडॉगचा फोटो शेअर केला होता. त्या फोटोमुळे या चर्चांना उधाण आलं होतं. पण, या चर्चांना समांथाने पूर्णविराम दिला आहे. समांथाने नागा चैतन्यच्या नावाचा टॅटू काढून टाकला आहे. 

समांथाने कमरेच्या वरच्या बाजूला नागा चैतन्यचं निक नेमचा टॅटू काढला होता. ते दोघे एकत्र असताना समांथाने नागा चैतन्यसाठी आणखी दोन टॅटू काढले होते. अनेक फोटोंमधूनही समांथाने हे टॅटू फ्लाँट केले होते. पण, आता समांथाने हा टॅटू काढून टाकला आहे. समांथाच्या लेटेस्ट फोटोमध्ये हा टॅटू दिसत नाहीये. समांथाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये समांथाने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. समांथाने फोटोशूटसाठी हटके पोझही दिल्या आहेत. तिच्या या फोटोंमध्ये नागा चैतन्यसाठी काढलेला टॅटू दिसत नाहीये. त्यामुळे नागा चैतन्यबरोबरच्या पॅच अपच्या चर्चांना समांथाने पूर्णविराम दिला आहे. समांथा आणि नागा चैतन्यने २०१७ साली लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ते लोकप्रिय कपल होते. पण, खटके उडाल्याने २०२१ साली त्यांनी घटस्फोट घेत वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

Web Title: samantha rukh prabhu removed tattoo of ex husband naga chaitanya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.