घटस्फोटानंतर पहिल्यांदाच एकाच कार्यक्रमात दिसले समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 02:48 PM2024-03-20T14:48:55+5:302024-03-20T14:54:13+5:30

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि तिचा पती नागा चैतन्य हे त्यांच्या घटस्फोटानंतर सतत चर्चेत आहेत.

Samantha Ruth Prabhu and Naga Chaitanya appeared on the prime video show for the first time after their divorce, photo goes viral | घटस्फोटानंतर पहिल्यांदाच एकाच कार्यक्रमात दिसले समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य, फोटो व्हायरल

घटस्फोटानंतर पहिल्यांदाच एकाच कार्यक्रमात दिसले समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य, फोटो व्हायरल

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि तिचा पती नागा चैतन्य हे त्यांच्या घटस्फोटानंतर सतत चर्चेत आहेत. त्यांचा घटस्फोट झाला असला तरी देखील त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे की त्या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र यावे. समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य हे दक्षिणेतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होतं. जेव्हा या जोडप्यानं घटस्फोटाची घोषणा केली, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. समंथा आणि नागा यांच्या घटस्फोटाला ३ वर्षे झाली आहेत. यातच आता पहिल्यांदाच समंथा आणि नागा एका कार्यक्रमात समोरासमोर आले होते. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काल (19 मार्च) मुंबईत प्राइम व्हिडीओचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात समंथा आणि नागा चैतन्य (Samantha Prabhu-Naga Chaitanya) सहभागी झाले होते. समंथा 'सिटाडेल हनी बनी'च्या लॉन्चिंगसाठी अभिनेता वरुण धवनसोबत इव्हेंटमध्ये पोहोचली होती. तर नागा त्याच्या 'धूता' शोचं यश सेलिब्रेट करण्यासाठी पोहचला होता. समंथा आणि नागा यांनी या कार्यक्रमात एकत्र स्टेज शेअर केलं नाही, पण बऱ्याच वर्षांनंतर दोघेही एका कार्यक्रमात सहभागी झाले. या इव्हेंटमध्ये प्रियांका चोप्रा, सूर्या, शाहिद कपूर, बॉबी देओल, तमन्ना भाटिया, शोभिता धुलिपाला यांच्यासह अनेक कलाकार सहभागी झाले होते. 

समंथा आणि नागा यांचं लग्न २०१७ मध्ये झालं होते. हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि या जोडप्याने केवळ 4 वर्षांतच वेगळे होण्याचा निर्णय घेतला. समांथा आणि नागा चैतन्य यांनी 2021 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली असली तरी देखील त्यावर्षाच्या सुरुवातीला नागा चैतन्यनं एका मुलाखतीत खुलासा केला की घटस्फोट एक वर्ष आधीच झाला होता आणि आता एक वर्षापासून आम्ही कायदेशीरपणे विभक्त होत होतो. घटस्फोटानंतर आजारपणामुळे समांथाने अभिनयातून एक वर्षाचा ब्रेक घेतला. आता ब्रेक संपवून समंथा कामावर परतली आहे. नागा चैतन्यबद्दल बोलायचे झाले तर तो सई पल्लवीसोबत 'थंडेल'मध्ये दिसणार आहे.

Web Title: Samantha Ruth Prabhu and Naga Chaitanya appeared on the prime video show for the first time after their divorce, photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.