वेडिंग ड्रेस अन् 'टॅटू'नंतर समांथाने पूर्व पतीची आणखी एक आठवण मिटवली, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 09:18 IST2025-03-12T09:18:15+5:302025-03-12T09:18:27+5:30

समांथा ही​​​​​ नागा चैतन्यसोबतच्या आठवणी मिटवण्याचा प्रयत्न करतेय. 

Samantha Ruth Prabhu Repurposes Engagement Ring Into Pendant After Divorce From Naga Chaitanya | वेडिंग ड्रेस अन् 'टॅटू'नंतर समांथाने पूर्व पतीची आणखी एक आठवण मिटवली, जाणून घ्या

वेडिंग ड्रेस अन् 'टॅटू'नंतर समांथाने पूर्व पतीची आणखी एक आठवण मिटवली, जाणून घ्या

Samantha Ruth Prabhu: अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या जीवनात अनेक चढउतार आलेत, पण ती सर्व संकटांवर मात करत पुढे गेली. अभिनेता नागा चैतन्यपासून (Naga Chaitnya) घटस्फोट, नंतर 'मायोसिटिस आजाराचा तिनं मोठ्या हिंमतीन सामना केला. समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांना वेगळं होऊन बराच काळ लोटला आहे. दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत.  नुकतंच समांथाचा EX पती नागा चैतन्यनं अभिनेत्री शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) हिच्यासोबत लग्न करत नवा संसार थाटला आहे. समांथा सध्या एकटीच आहे. ती नागा चैतन्यसोबत  जोडलेल्या आठवणी मिटवण्याचा प्रयत्न करतेय. 

समांथानं काही दिवसांपुर्वी समांथाने तिचा लग्नाचा गाऊन फाडून त्याला एक नवीन रूप दिलं आहे.  नागा चैतन्यसोबतच्या तिच्या ख्रिश्चन लग्नाच्या वेळी परिधान केलेला सुंदर पांढरा गाऊनचं तिनं काळ्या कॉर्सेटमध्ये (Samantha Revenge Dress) रूपांतर केले आहे. अनेकांनी त्या ड्रेसला रिव्हेंज ड्रेसही म्हटलं.  वेडिंग ड्रेसनंतर तिच्या बरगड्यांवरचा 'Chay' असा टॅटू तिनं हटविला होता.  नाग चैतन्यला अनेकजण 'चै' (Chay) या नावाने ओळखतात. हे त्याचं टोपणनाव आहे. वेडिंग ड्रेस आणि 'टॅटू'नंतर समांथाने नागा चैतन्यशी जोडणारी आणखी एक आठवण मिटवली आहे. 


नाग चैतन्यने समंथाला तीन कॅरेट प्रिन्सेस कट डायमंड रिंग घालून प्रपोज केलं होतं. आता त्याच प्रिन्सेस कट डायमंडपासून समांथाने पेंडंट (Samantha Ruth Prabhu Repurposes Engagement Ring Into Pendant ) बनवलं आहे. समांथाच्या गळ्यातील चेनमध्ये अगदी तसंच पेंडंट पहायला मिळतंय. साखरपुड्याच्या अंगठीपासून पेंडंट बनवल्याचं तिने सोशल मीडियावर सांगितलेलं नाही. पण, नेटकऱ्यांनी आंगठी आणि पेंडंटमधील साम्य शोधून काढलंय. तसेच ज्वेलरी इन्फ्लुएन्सर ध्रुमित मेरुलियाने समंथाच्या साखरपुड्याच्या अंगठीबाबत हा दावा केला आहे.

समांथा आणि नाग चैतन्यने २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या चार वर्षांच्या संसारानंतर ही लोकप्रिय जोडी विभक्त झाली. २ ऑक्टोबर २०२१ रोजी समांथा आणि नाग चैतन्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. समांथाशी घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यने काही महिन्यांपूर्वीच शोभिता धुलिपालाशी लग्न करत नव्याने संसार थाटला. त्यामुळे नागा चैतन्य आणि शोभितालाही ट्रोल केलं गेलं होतं. याशिवाय समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटासाठी शोभिता जबाबदार असल्याचं चाहत्यांचं म्हणणं होतं.
 

Web Title: Samantha Ruth Prabhu Repurposes Engagement Ring Into Pendant After Divorce From Naga Chaitanya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.