समंथा रुथ प्रभूचा 'व्हॅलेंटाईन' कोण! प्रेमात असल्याची दिली कबुली? शेअर केले बोल्ड Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 15:55 IST2025-02-14T15:53:22+5:302025-02-14T15:55:11+5:30

समंथाच्या फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.

Samantha Ruth Prabhu s Valentine s Day special post confessed to being in love ? Shared bold photos | समंथा रुथ प्रभूचा 'व्हॅलेंटाईन' कोण! प्रेमात असल्याची दिली कबुली? शेअर केले बोल्ड Photos

समंथा रुथ प्रभूचा 'व्हॅलेंटाईन' कोण! प्रेमात असल्याची दिली कबुली? शेअर केले बोल्ड Photos

साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samatha Ruth Prabhu) तिच्या घटस्फोटामुळे कायम चर्चेत असते. नागा चैतन्यसोबत तिचा २०२१ मध्ये घटस्फोट झाला. यामुळे दोघांच्या चाहत्यांनाही चांगलाच धक्का बसला होता. घटस्फोटानंतर समंथा मानसिकरित्या खचली होती. त्यातच तिला मायोसायटिस आजाराचा सामना करावा लागला. तिने मधल्या काळात कामातूनही ब्रेक घेतला होता. दरम्यान एकीकडे नागा चैतन्यने दुसरं लग्न केलं असता दुसरीकडे समंथाच्या आयुष्यातही नवीन प्रेमाची एन्ट्री झाल्याची चर्चा आहे.

आज व्हॅलेंटाईन डे निमित्त समंथाने काही फोटो शेअर केलेत. यातून तिने ती प्रेमात असल्याची हिंटही दिली आहे. समंथाने इन्स्टाग्रामवर तिचा ग्लॅमरस लूकमधला फोटो पोस्ट केला आहे. तिने बोल्ड मिनी वनपीसही घातला आहे ज्या फोटोने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. याशिवाय तिने डिनर डेटची जागाही दाखवली आहे. मात्र रिकाम्या टेबलचाच फोटो तिने पोस्ट केला आहे. यासोबत ती मिस्ट्री मॅनसोबत चिअर्स करताना दिसतेय. यात तिने त्याचा चेहरा दाखवलेला नाही. तसंच एका चादरीवर हार्ट शेप आहे याचाही फोटो  तिने शेअर करत प्रेमात पडल्याची हिंट दिली आहे. 


या पोस्टसोबत समंथाने लिहिले, "छोटीशीच झलक किंवा याहून मोठी."  आज प्रेमाच्या खास दिवशी समंथाने हे फोटो शेअर केल्याने चाहत्यांनी ती प्रेमात असल्याचाच अंदाज बांधला आहे. काही दिवसांपूर्वीच समंथाचा राज निदिमोरुसोबतचा फोटो व्हायरल झाला होता. राज दिग्दर्शक असून 'सिटाडेल हनी बनी'चं सीरिज त्यानेच दिग्दर्शित केली होती. समंथा यामध्ये मुख्य भूमिकेत होती. समांथा ही चेन्नई सुपर चँप्स या पिकलबॉल टीमची मालकीण आहे.. नुकतंच समांथा वर्ल्ड पिकलबॉल लीगमध्ये आपल्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी पोहचली होती. 

Web Title: Samantha Ruth Prabhu s Valentine s Day special post confessed to being in love ? Shared bold photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.