प्रेम म्हणजे त्याग! नागा चैतन्य-शोभिताच्या साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाली समांथा, म्हणते- "समोरच्या व्यक्तीकडून..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 12:35 PM2024-08-25T12:35:08+5:302024-08-25T12:35:44+5:30
नागा चैतन्यने शोभिताशी साखरपुडा केल्यानंतर आता समांथा पहिल्यांदाच व्यक्त झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवरुन एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
समांथा रुथ प्रभूशी घटस्फोट घेतल्यानंत तीन वर्षांनी नागा चैतन्य पुन्हा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. साऊथ स्टार नागा चैतन्यने ८ ऑगस्टला बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी साखरपुडा करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. लवकरच ते दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. नागा चैतन्यने शोभिताशी साखरपुडा केल्यानंतर आता समांथा पहिल्यांदाच व्यक्त झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवरुन एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
समांथी प्रभूची पोस्ट
अनेकांना असं वाटतं की मैत्री आणि रिलेशनशिप हे एकमेकांवर अवलंबून असतं आणि याच्याशी मी सहमत आहे. पण, गेल्या काही वर्षांत मला हे जाणवलं आहे की कधी कधी प्रेमात समोरच्या व्यक्तींकडून काहीही देण्याची तयारी नसताना आपण बरंच काही देतो. हे तोपर्यंत सुरू असतं जोपर्यंत समोरचा व्यक्ती ते परत देण्याच्या स्थितीत येत नाही. प्रेम म्हणजे त्याग आहे. मी त्या सगळ्या लोकांची आभारी आहे, जे माझ्याकडे काही देण्यासाठी नसतानाही मला कायम देत राहिले.
समांथा आणि नागा चैतन्यने २०१७ मध्ये लग्न केलं होतं. त्यांच्याकडे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आदर्श कपल म्हणून पाहिलं जायचं. लग्नानंतर चार वर्षांनी २०२१मध्ये ते घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटाने चाहत्यांना धक्का बसला होता. समांथापासून वेगळं झाल्यानंतर आता नागा चैतन्य नव्याने संसार थाटण्याच्या तयारीत आहे.