समंथाने अद्यापही हटवलेला नाही नागा चैतन्यसोबतचा फोटो, नेटकरी म्हणाले, 'डिलीट कर...'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 12:25 PM2024-12-04T12:25:40+5:302024-12-04T12:26:25+5:30
समंथाने अजूनही नागासोबतचा लग्नातला फोटो इन्स्टाग्राम फीडवर ठेवला आहे.
साऊथ स्टार नागा चैतन्य (Naga Chaitanya) आज अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. पारंपरिक रिती-रिवाजांसह दोघं लग्न करणार आहेत. या लग्नाची चर्चा खूप जोरात आहे कारण नागा चैत्यनचं हे दुसरं लग्न आहे. २०१७ साली तो समंथा रुथ प्रभूशी (Samantha Ruth Prabhu) लग्नबंधनात अडकला होता. तर २०२१ साली त्यांचा घटस्फोट झाला. समंथाने अजूनही नागासोबतचा लग्नातला फोटो इन्स्टाग्राम फीडवर ठेवला आहे. आता नेटकऱ्यांनी तिला तो फोटो डिलीट करण्याचा सल्ला दिला आहे.
नागा चैतन्य आणि समंथा यांनी २०१७ साली ऑक्टोबर महिन्यात लग्नगाठ बांधली होती. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात समंथाने नागासोबतचा फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा दिल्या होत्या. ख्रिश्चन पद्धतीने त्यांनी लग्न केलं होतं त्यातला हा फोटो आहे. यामध्ये समंथा नागाच्या गालावर किस करते तर नागाने तिला धरलं आहे. दोघांचा हा फोटो समंथाने अजूनही आपल्या इन्स्टाग्रामवरुन डिलीट केलेला नाही.
नेटकऱ्यांनी या फोटोवर नुकतेच रिप्लाय केले आहेत. 'हा फोटो पुन्हा माझ्या फीडवर का येतोय','प्लीज सॅम डिलीट कर...आता तू पुढे तुला काय हवं ते करावं' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. समंथासाठी चाहत्यांना खूप वाईट वाटत आहे.
काही दिवसांपूर्वीच समंथावर आणखी एक दु:खाचा डोंगर कोसळला. तिच्या वडिलांचं निधन झालं. तर आज नागा चैतन्य दुसरं लग्न करत आहे. नुकतीच समंथाची 'सिटाडेल: हनी बनी' सीरिज रिलीज झाली आहे. दरम्यान काही वर्षांपासून समंथा मायोसायटिस आजाराचा सामनाही करत आहे.