नागा चैतन्यच्या लग्नाच्या तयारीदरम्यान समांथाने शेअर केली प्रेरणादायी पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 03:59 PM2024-11-21T15:59:13+5:302024-11-21T16:00:07+5:30
समांथाने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जी सध्या चर्चेत आहेत.
Samantha Ruth Prabhu Post: अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. दक्षिणेसह बॉलिवूडमध्ये अप्रतिम अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं. सामंथा सोशल मीडियावर सक्रिय राहते आणि अनेकदा चाहत्यांसोबत आयुष्यातील अपडेट शेअर करते. अभिनेता नाग चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यापासून समांथा एकटीच आहे. तर नागा चैतन्य लवकर अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे. यातच समांथाने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जी सध्या चर्चेत आहेत.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाच्या तयारीदरम्यान समांथा हिने लेखक रुडयार्ड किपलिंग यांची लोकप्रिय कविता सोशल मीडियावर शेअर केली आहे. या कविता तिच्यासाठी नेहमीच मार्गदर्शक असल्याचं समांथाने म्हटलं. समांथाने पोस्ट केलेली कविता अशी आहे की, "जेव्हा प्रत्येकजण आपला संयम गमावत असेल आणि तुम्हाला दोष देत असेल तेव्हा देखील तुम्ही शांत राहू शकत असाल. जेव्हा सर्वजण तुमच्यावर शंका घेत असतील, तुम्हाला दोष देत असतील, पण तरीही त्या गोष्टीचे वाईट वाटून न घेता तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू शकत असाल. जर तुम्ही न थकता वाट पाहू शकत असाल. खोटे बोलणे टाळू शकत असाल आणि इतरांनी तुमचा द्वेष केला तरीही तुम्ही कुणाचा द्वेष करत नसाल. ना अधिक सुंदर दिसण्याची इच्छा ना अधिक हुशार लोकांसारखे बोलण्याची इच्छा असेल". समांथाने शेअर केलेली ही कविता सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
समांथाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलताना तिची 'सिटाडेल: हनी बनी' ही सीरीज नुकतीच प्रदर्शित झाली आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत अभिनेता वरुण धवन मुख्य भूमिकेत आहे. दरम्यान, नागा आणि शोभिता ४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. धुलीपालाने तिच्या खास दिवसासाठी कांजीवरम सिल्क साडी निवडली आहे. त्याचबरोबर नागा चैतन्यही लग्नात धोती आणि कुर्ता परिधान करणार आहे. दोघांची नुकतीच एंगेजमेंट झाली होती. दरम्यान, नागा चैतन्या आणि समांथाने लग्नाच्या तीन वर्षानंतर 2021 मध्ये घटस्फोट घेतला.