धनुषच्या 'डीएनएस' सिनेमाच्या चित्रीकरणाला ब्रेक; पोलिसांनी थांबवलं तिरुपतीमधली शूट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 09:58 AM2024-02-01T09:58:39+5:302024-02-01T09:59:31+5:30
Dhanush: पोलिसांनी नेमकं का बंद करायला लावलं धनुषच्या सिनेमाचं चित्रीकरण?
साऊथचा पुष्पा अर्थात दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष (dhanush) याचा 'कॅप्टन मिलर' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आहे. त्यामुळे सध्या तो चर्चेत येत आहे. या सिनेमानंतर धनुष त्याच्या आगामी सिनेमाकडे वळला आहे. मात्र, या सिनेमाचं चित्रीकरण होण्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्यावर बंदी आणली आहे. त्यामुळे धनुषच्या सिनेमाला ब्रेक मिळाला आहे.
धनुष लवकरच दिग्दर्शक शेखर कममुला यांच्या 'डीएनएस' या आगामी सिनेमात झळकणार आहे. नुकतंच या सिनेमाचं चित्रीकरण सुरु झालं असून त्याचं एक शेड्यूल तिरुपतीमध्ये पार पडणार होतं. या शुटिंगसाठी सिनेमाच्या सगळ्या टीमने तयारी सुद्धा केली होती. परंतु, ऐनवेळी पोलिसांनी हे शुटिंग थांबवलं.
'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, डीएनएस या सिनेमाचा काही दिवसांपूर्वीच मुहूर्त सोहळा पार पडला. त्यानंतर सिनेमाच्या चित्रीकरणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या सिनेमाचं पहिलं शेड्युल तिरुपती मध्ये होते. परंतु, पोलिसांची परवानगी न मिळ्यामुळे पहिलचं शूट थांबवावं लागलं.
#dhanush sir #DNS#D51 movie shooting in my city #tirupati 💥 pic.twitter.com/FYwWlcvAxY
— Jayanth Jackson (@JayanthJackson0) January 30, 2024
या सिनेमाचं शूट तिरुपती पर्वाताच्या पायथ्याशी होणार होतं. त्यामुळे त्या मार्गावरुन जाणारी वाहने सुद्धा दुसऱ्या दिशेने वळवण्यात आली. परिणामी, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. इतकंच नाही तर गोविंदराजा स्वामी मंदिराबाहेर या सिनेमाचं शूट करायचं असल्यामुळे चित्रपटाच्या क्रू मेंबर्सनेही भक्तांना बाहेर पाठवलं. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी जात शूटिंग थांबवलं. दरम्यान, या सिनेमात धनुषव्यतिरिक्त रश्मिका मंदाना आणि नागार्जुनदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.