"लिंक्स मागणं थांबवा, सगळ्या बायकांचं शरीर एकसारखंच...", प्रायव्हेट व्हिडिओ लीक झाल्यानंतर साऊथ अभिनेत्रीचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 09:15 IST2025-03-30T09:14:44+5:302025-03-30T09:15:20+5:30
ऑडिशन दरम्यान कास्टिंग काऊचचा श्रुतीचा हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर श्रुती भडकली. अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही पोस्टही शेअर केल्या आहेत.

"लिंक्स मागणं थांबवा, सगळ्या बायकांचं शरीर एकसारखंच...", प्रायव्हेट व्हिडिओ लीक झाल्यानंतर साऊथ अभिनेत्रीचा संताप
दाक्षिणात्य अभिनेत्री श्रुती नारायणन(Shruthi Narayanan)चा १४ मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडिओ काही दिवसांपूर्वी लीक झाला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत होता. ऑडिशन दरम्यान कास्टिंग काऊचचा श्रुतीचा हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर श्रुती भडकली. अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही पोस्टही शेअर केल्या आहेत.
या पोस्टमध्ये श्रुतीने "तुम्हा लोकांसाठी, माझ्याबद्दल असं काही पसरवणं मजेदार वाटत असेल. तुम्हाला मजा येत असेल. पण माझ्यासाठी आणि माझ्या जवळच्या लोकांसाठी ही खूप कठीण परिस्थिती आहे. विशेषत: माझ्यासाठी हा खूप कठीण काळ आहे आणि तो हाताळणे अधिक कठीण आहे. मी देखील एक मुलगी आहे आणि मलाही भावना आहेत. माझ्या जवळच्या लोकांनाही भावना आहेत. तुम्ही लोक हे वाईट करत आहात. माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की, सर्वकाही जंगलातील वणव्यासारखे पसरवू नका. आणि जर तसंच असेल तर तुमची आई, बहीण किंवा मैत्रिणींचे व्हिडिओ पाहा. कारण, त्या देखील मुली आहेत आणि त्यांचेही शरीर माझ्यासारखेच आहे, त्यामुळे जा आणि त्यांच्या व्हिडिओंचा आनंद घ्या", असं म्हटलं आहे.
पुढे श्रुतीने व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांनाही सुनावलं. ती म्हणते, "हे एका व्यक्तीचे जीवन आहे, तुमचे मनोरंजन नाही. मी पीडितेला दोष देणाऱ्या अनेक कमेंट आणि पोस्ट पाहिल्या आहेत, पण मला पुरुषांना विचारायचे आहे की, याबाबत नेहमीच महिलेलाच दोषी का ठरवले जाते? जे लोक तो व्हिडिओ पाहतात त्यांना का काही बोलले जात नाही. यावर लोक ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत ते घृणास्पद आहे. लिंक्स मागणे थांबवा, माणूस बनायला सुरुवात करा. सर्व महिलांचे शरीराचे अवयव सारखेच असतात, जसे की तुमची आई, आजी, बहीण किंवा पत्नीचे आहे. ही काही मोठी गोष्ट नाही. हा फक्त एक व्हिडिओ नाहीये, तर तो एखाद्याच्या मानसिक आरोग्याचा आणि आयुष्याचा प्रश्न आहे. एआय-जनरेटेड डीपफेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत आणि जर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत असाल तर तुम्हीही समस्येचा भाग आहात. अशा गोष्टी शेअर करणे थांबवा, लिंक्स मागणे थांबवा. माणूस बनायला सुरुवात करा. लीक झालेला व्हिडिओ शेअर करणे हा गुन्हा आहे, मग तो खरा असो किंवा डीपफेक, भारतात तो शेअर करणे हा गुन्हा आहे".
कोण आहे श्रुती नारायणन?
श्रुती नारायणनने वयाच्या २४व्या वर्षी तमिळ टीव्ही मालिकांमधून तिच्या करिअरची सुरुवात केली. नंतर, सिरागडिक्का असाई सारख्या शोमधून अभिनेत्रीला ओळख मिळाली. मात्र, तिला खरे यश मिळाले जेव्हा तिने चित्रपटात पाऊल ठेवले. इंस्टाग्रामवर तिचे ४ लाख २० हजार फॉलोअर्स आहेत.