'सिंघम' फेम अभिनेत्याचा ६५ व्या वर्षी मृत्यू, मनोरंजन विश्वावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 02:01 PM2024-04-12T14:01:32+5:302024-04-12T14:01:59+5:30
सिंघम सिनेमातील लोकप्रिय अभिनेता काळाच्या पडद्याआड. राजकारणातही होते सक्रीय
'सिंघम' सिनेमात काम केलेल्या अभिनेत्याचं निधन झाल्याची दुःखद बातमी समोर येतेय. तामिळमधील 'सिंघम' सिनेमात अभिनय केलेले लोकप्रिय अभिनेते अरुलमणी यांचं दुःखद निधन झालंय. वयाच्या ६५ व्या वर्षी अरुलमणी यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुलमणी यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अरुलमणी मनोरंजन विश्वात कार्यरत होते.
हृदयविकाराच्या झटक्याने अरुलमणी यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने अरुलमणी यांना रोवापेठ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून ते AIADMK पक्षासाठी काम करत होते. अरुलमणी यांच्या अकस्मात निधनाने पक्षातील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसलाय. तामिळ सिनेमा गाजवून अरुलमणी राजकारणात सक्रीय होते.
Seshu, Daniel Balaji .... Now Arulmani ...
— Bhuvana Seshan (@bhuvanaseshan) April 12, 2024
Cardiac arrest This is so terrible.....
Rest in peace. pic.twitter.com/TKLKaSHJaa
अरुलमणी AIADMK पक्षात गेल्या काही दिवसांपासून सक्रीय होते. लोकसभा निवडणुकीसाठी अरुलमणी यांनी कंबर कसली होती. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षाचा प्रचार करण्यात व्यस्त होते. दहा दिवस ते विविध शहरांमध्ये पक्षाच्या कामात व्यस्त होते. पक्षाचा एक भक्कम आधारस्तंभ गमावला अशी भावना AIADMK कार्यकर्त्यांच्या मनात आहे.