अभिनेत्री शोभिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ? डेटिंगबद्दल केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 01:42 PM2024-05-05T13:42:55+5:302024-05-05T13:43:33+5:30

शोभिताने डेटिंगबद्दल मोठा खुलासा केला आहे. 

Sobhita Dhulipala Discusses Being 'Less Needy' In Love Amid Dating Rumors With Naga Chaitanya | अभिनेत्री शोभिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ? डेटिंगबद्दल केला मोठा खुलासा

अभिनेत्री शोभिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ? डेटिंगबद्दल केला मोठा खुलासा

साऊथ सिनेमाचा स्टार नागा चैतन्य आपल्या चित्रपटांपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. नागा 2021 मध्ये त्याची अभिनेत्री समंथा रुथ प्रभूपासून विभक्त झाला. यानंतर नागाचं नाव सातत्याने दुसऱ्या एका अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय. नागा आणि अभिनेत्री शोभिता धुलिपालाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातच आता शोभिताने डेटिंगबद्दल मोठा खुलासा केला आहे. 

शोभितानं नुकतेच जीक्यू इंडियाला मुलाखत दिली आहे. मुलाखतीमध्ये शोभिातानं लव्हलाईफवर भाष्य केलं. शोभिता धुलीपालाला विचारण्यात आले की तिचे कुणावर प्रेम आहे ? यावर ती म्हणाली, 'मी नेहमीच प्रेमात असते. प्रेम हे माणसांसाठी इंधनासारखं काम करतं. मला वाटते की ही अशी गोष्ट आहे जी आवश्यक आणि अमूल्य आहे'.

पुढे ती म्हणाली, 'माझ्याकडे पाहून अनेकांना असं वाटतं की, मी खूप खंबीर आणि कठोर आहे. मी आजवर जशा भूमिका साकारल्या आहेत, त्यापाहून अनेकांच्या मनात माझ्याबद्दल अशी प्रतिमा आहे. पण मी पूर्णपणे त्या विरोधात आहे. पण माझा स्वभाव शांत आणि थोडा खोडकर आहे. माझ्यासाठी प्रेम हे जगातील सर्वात शुद्ध गोष्ट आहे. माझ्या फारशा गरजा नाहीत'.

नागा चैतन्यने 2017 मध्ये समंथा रुथ प्रभूसोबत लग्न केल होतं . दोघांनी लग्नाआधी काही वर्षे एकमेकांना डेट केले होते, पण लग्नाच्या चार वर्षातच नागा आणि समंथा यांच्यात मतभेद सुरू झाले आणि त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये दोघेही वेगळे झाले. घटस्फोटानंतर, समंथा कामात पूर्णपणे व्यस्त झाली आणि ती अजूनही सिंगल आहे. तर नागाचं नाव शोभिता धूलिपलासोबत जोडलं गेलं आहे.  

शोभिता ही एक लोकप्रिय मॉडेल व अभिनेत्री आहे. "मेड इन हेवन" या सुपरहिट वेब शोमध्ये ती दिसली होती. अलीकडे महेशबाबूच्या "मेजर" या चित्रपटात ती दिसली होती. शोभिता हिंदी, मल्याळम, तेलगू चित्रपटात काम करते. सोशल मीडियावर ती सतत स्वत:चे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. शोभिता धुलिपालाचा जन्म आंध्र प्रदेशमध्ये झाला. 
 

Web Title: Sobhita Dhulipala Discusses Being 'Less Needy' In Love Amid Dating Rumors With Naga Chaitanya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.