मुलीच्या आत्महत्येनंतर ९ दिवसातच विजय अँटोनी कामावर परतला, निर्मात्याने केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 01:03 PM2023-09-29T13:03:43+5:302023-09-29T13:06:51+5:30
निर्माता जी धनंजयन यांनी 'रथम'च्या प्रमोशनल मुलाखतींचे फोटो शेअर करत विजयचं कौतुक केलं आहे.
विजय अँटोनी (Vijay Antony) हा साऊथमधील आघाडीचा अभिनेता आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या १६ वर्षीय मुलीने नैराश्यातून आत्महत्या केली. अभिनेत्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला. मुलीच्या निधनानंतर ९ दिवसातच विजय कामावर परतला आहे. अभिनेत्याने आगामी 'रथम' सिनेमाचं प्रमोशन सुरु केलं आहे. निर्माता जी धनंजयन यांनी 'रथम'च्या प्रमोशनल मुलाखतींचे फोटो शेअर करत विजयचं कौतुक केलं आहे.
विजय अँटोनी मुलाखत देत असतानाचे फोटो शेअर करत निर्माता जी धनंजयन म्हणाले,'प्रोफेशनलिझमचे जीवंत उदाहरण म्हणजे विजय अँटोनी. आपल्या निर्माता आणि प्रेक्षकांची काळजी ते घेत आहेत. 'रथम' च्या कलाकारांसोबत सिनेमाला पाठिंबा देण्यासाठी ते प्रमोशनल मुलाखतींचा भाग होत आहेत.वैयक्तिक आयुष्यातील सर्वात मोठ्या दु:खातून बाहेर येत आपल्या टीमला पाठिंबा देण्यासाठी ते आले. खूपच प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि इंडस्ट्रीसाठी एक बेंचमार्क आहे. धन्यवाद सर.'
True example of professionalism, care for his Producers & Audience by @vijayantony sir - supporting our film #Raththam by being a part of promotional interviews with @csamudhan @ @Mahima_Nambiar today to various channels. A great inspiration & benchmark for the industry, by the… pic.twitter.com/Fgaxns2Ib5
— G Dhananjeyan (@Dhananjayang) September 28, 2023
जी धनंजयन यांच्या पोस्टवर चाहतेही विजयची स्तुती करत आहेत. कठीण समयी दाखवलेल्या धाडसासाठी चाहत्यांनी अभिनेत्याचं कौतुक केलं.'तुम्हाला या दु:खातून सावरण्यासाठी बळ मिळो' अशी प्रार्थना चाहत्यांनी केली आहे. मुलीच्या निधनानंतर विजयने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. 'मुलीसोबत मी सुद्धा आतून मेलो आहे' अशा शब्दात तो व्यक्त झाला होता.