ख्रिश्चन पद्धतीने लग्न करण्याच्या निर्णयाला कीर्ती सुरेशच्या वडिलांचा होता विरोध? अभिनेत्री खुलासा करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:21 IST2025-01-03T12:16:48+5:302025-01-03T12:21:04+5:30
दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश (Keerthy Suresh) तिच्या अभिनयाने आणि अदाकारीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

ख्रिश्चन पद्धतीने लग्न करण्याच्या निर्णयाला कीर्ती सुरेशच्या वडिलांचा होता विरोध? अभिनेत्री खुलासा करत म्हणाली...
Keerthy Suresh: दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश (Keerthy Suresh) तिच्या अभिनयाने आणि अदाकारीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. दरम्यान, साउथ इंडस्ट्रीतील या लोकप्रिय अभिनेत्रीने 'बेबी जॉन' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्यामुळे कीर्तीची चांगलीच चर्चा झाली. अगदी गेल्या महिन्यातच अभिनेत्रीने तिचा प्रियकर अॅंटनी थाटीलसोबत हिंदू रितीरिवाजानूसार लग्नबंधनात अडकली. १२ डिसेंबरच्या दिवशी कीर्ती-अँटनी यांचा लग्नसोहळा पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीने गोव्यात पार पडला. त्यानंतर तिने ख्रिश्चन पद्धतीने देखील गोव्यात लग्न केलं. तिच्या लग्नाचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्यावर किर्तीच्या वडिलांची काय प्रतिक्रिया होती याचा खुलासा नुकताच अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला आहे.
साउथ क्वीन कीर्ती सुरेशने 'गलाटा इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत तिने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केल्यामुळे वडील काय म्हणाले होते याबद्दल सांगितलं. त्यादरम्यान मुलाखतीमध्ये कीर्ती म्हणाली, "मी माझ्या वडिलांना विचारलं की, ख्रिश्चन पद्धतीने लग्न करताना वडिलांनी आपल्या मुलीला लग्नमंडपापर्यंत नेण्याची प्रथा असते. तुम्ही माझ्यासाठी हे कराल का? त्यावर त्यांची रिअॅक्शन अशी होती की, हा का नाही. आपण हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानूसार लग्न करत आहोत, तर हे सगळं केलंच पाहिजे. माझ्याव्यतिरिक्त तुला कोण घेऊन जाईल?"
पुढे अभिनेत्री म्हणाली, "त्यांची अशी रिअॅक्शन असेल याचा मी विचारच केला नव्हता. त्यामुळे मला प्रचंड आनंद झाला."
अभिनेत्री कीर्ती सुरेश गेल्या अनेक वर्षांपासून अँटनी थाटीलला डेट करत होती. अगदी काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर अँटनी थाटीलबरोबर एक फोटो पोस्ट केला होता. या पोस्टच्या माध्यमातून कीर्तीने त्यांच्या नात्याची कबुली दिली. कीर्ती सुरेश ही दाक्षिणात्य चित्रपट निर्माते जी सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका यांची मुलगी आहे. कीर्तीने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर 'गीतांजली' या मल्याळम चित्रपटात मुख्य भूमिका साकारून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आता ती तामिळ आणि तेलुगू सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.