'द डर्टी पिक्चर'नंतर सिल्क स्मितावर येतोय आणखी एक बायोपिक! ही अभिनेत्री प्रमुख भूमिकेत; टीझर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 10:54 AM2024-12-03T10:54:53+5:302024-12-03T10:55:15+5:30
साऊथमध्ये बोल्ड भूमिकांनी प्रसिद्ध असलेल्या सिल्क स्मितावर बायोपीक येत असून त्याचा टीझर रिलीज झालाय
'द डर्टी पिक्चर' सर्वांना माहित असेलच. विद्या बालनच्या करिअरला या सिनेमामुळे वेगळीच कलाटणी मिळाली. साऊथमध्ये बोल्ड भूमिकांनी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सिल्क स्मिताच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारीत होता. नसीरुद्दीन शाह, इमरान हाश्मी, तुषार कपूर या अभिनेत्यांनी सिनेमात भूमिका साकारली होती. बोल्ड क्वीन अशी ओळख असलेल्या सिल्क स्मितावर नवा सिनेमा येणार असून हा तिचा बायोपिक असणार आहे. या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली.
सिल्क स्मितावर बायोपिक
डिसेंबरमध्ये साउथ फिल्म इंडस्ट्रीची क्वीन सिल्क स्मिताच्या जयंतीला अभिनेत्रीच्या आयुष्यावर आधारीत बायोपिक फिल्मची घोषणा करण्यात आलीय. अभिनेत्री चंद्रिका रावने या बायोपिकचा टीझर शेअर केलाय. सुरुवातीला तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींकडे मॅगझीन आणि वृत्तपत्र येतात. त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सिल्क स्मिताच्या बातम्या आलेल्या असतात. इंदिराजी PA ला ही कोण आहे असं विचारतात? तेव्हा PA म्हणतो, "तुम्ही आयर्न लेडी आहात तर ही मॅग्नेटिक लेडी आहे."
पुढे एका गाडीतून उतरत सिल्क स्मिता प्रवेश करताना दिसते. रस्त्यावरील सामान्य माणसांचा तिला पाहून आ वासतो. स्मिताच्या बोल्ड अदा पाहून सर्वच घायाळ होतात. शेवटी एका चाहत्याच्या हृदयावर स्मिता लिपस्टिकने दिल बनवते. शेवटी स्मितावर झालेले आरोप आणि तिला मिळालेल्या प्रसिद्धीची झलक दिसते. अभिनेत्री चंद्रिका रावचा अभिनय आणि लूक हुबेहुब सिल्क स्मितासारखा झालेला दिसतोय. हा सिनेमा लवकरच थिएटरमध्ये रिलीज होईल.