"मी सिंगल आहे असं कधीच म्हणाले नव्हते...", लहानपणीच्या मित्रासोबत अभिनेत्री बांधणार लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 03:23 PM2024-11-27T15:23:13+5:302024-11-27T15:27:06+5:30

नुकतंच तिने रिलेशनशिपवर प्रतिक्रिया दिली आहे.

south actress Keerthy suresh getting married to childhood friend says never been single | "मी सिंगल आहे असं कधीच म्हणाले नव्हते...", लहानपणीच्या मित्रासोबत अभिनेत्री बांधणार लग्नगाठ

"मी सिंगल आहे असं कधीच म्हणाले नव्हते...", लहानपणीच्या मित्रासोबत अभिनेत्री बांधणार लग्नगाठ

सध्या सिनेसृष्टीतही लग्नाचं वारं वाहत आहे. साऊथ स्टार नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लग्नगाठ बांधणार आहेत. तर आणखी एका अभिनेत्रीने नुकतीच तिच्या लग्नाची बातमी दिली आहे. नैन मटक्का' फेम अभिनेत्री कीर्ती सुरेश (Keerthy Suresh) तिच्या लाँग टर्म बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. तो तिचा लहानपणापासूनचा मित्र आहे. नुकतंच तिने रिलेशनशिपवर प्रतिक्रिया दिली आहे.

कीर्ती सुरेश लहानपणीचा मित्र एंटनी थाटिलसोबत लग्न करणार आहे. अनेक वर्षांपासून दोघंही रिलेशनशिपमध्ये आहेत. गोवा मध्ये ते डेस्टिनेशन वेडिंग करतील अशी शक्यता आहे. जवळचे नातेवाईक, मित्रपरिवारासोबत ते सातफेरे घेतील. मात्र या सर्व प्लॅनिंगवर अभिनेत्रीने अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

'रघु थाथा' च्या प्रमोशनवेळी एका मुलाखतीत कीर्ती सुरेश म्हणाली, " मी सिंगल आहे असं कधीच म्हटलं नव्हतं. रिलेशनशिपमध्ये दोघंही एकमेकांचे चांगले मित्र असणं गरजेचं आहे. नात्यात देणं आणि घेणं दोन्ही असावं. एकमेकांवर जीव ओवाळून टाकण्याची दोघांची भावना असली पाहिजे."

कीर्ती सुरेशचा बॉयफ्रेंड एंटनी थाटिल प्रसिद्ध बिझनेसमन आहे. तो कोच्चि येथे राहणारा आहे. लाईमलाईटपासून तो कायम दूर असतो. दोघंही गेल्या १५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. हायस्कूलपासूनच त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. 

कीर्ती सुरेश लवकरच 'बेबी जॉन' सिनेमात दिसणार आहे. वरुण धवनसोबत ती पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहे. हा कीर्तीचा बॉलिवूड डेब्युही असणार आहे. २५ डिसेंबरला सिनेमा प्रदर्शित होत आहे. 

Web Title: south actress Keerthy suresh getting married to childhood friend says never been single

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.