एका जाहिरातीमुळे पालटलं दाक्षिणात्य अभिनेत्रीचं नशीब; सलमानसोबतच्या अफेअरमुळे आली होती चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 03:39 PM2024-02-16T15:39:09+5:302024-02-16T15:41:18+5:30

दक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री पूजा हेगडे हे नाव सिनेरसिकांसाठी नवं नाही.

south actress pooja hegde unknown facts worked with salman khan hritik roshan and ranveer singh in bollywood cinema  | एका जाहिरातीमुळे पालटलं दाक्षिणात्य अभिनेत्रीचं नशीब; सलमानसोबतच्या अफेअरमुळे आली होती चर्चेत

एका जाहिरातीमुळे पालटलं दाक्षिणात्य अभिनेत्रीचं नशीब; सलमानसोबतच्या अफेअरमुळे आली होती चर्चेत

Pooja hegde : दक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री पूजा हेगडे हे नाव सिनेरसिकांसाठी नवं नाही. गेल्या १० वर्षांपासून मनोरंजन विश्वात ही अभिनेत्री सक्रिय आहे. हिंदी, तमिळ तसेच तेलुगु पाठोपाठ अनेक सिनेमांमध्ये तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. 

पूजाने सुरुवातीच्या काळात बराच स्ट्रगल केला. यात तिने काही जाहिरातींमध्येही काम केलं. विशेष म्हणजे एका जाहिरातीमध्ये तिने अभिनेता रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर केली आणि तिचं नशीब पालटलं.

या जाहिरातीनंतर तिच्याकडे बॉलिवूड सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या. तिने हृतिक.... रणबीर यांसारख्या अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली.

२०१६ मध्ये आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित मोहेंजोदारो या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात तिच्यासोबत बॉलिवूडचा ग्रीक गॉड अर्थात हृतिक रोशन याने मुख्य भूमिका साकारली होती. उत्तम कथानक असूनही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा गाजला नाही. मात्र, पूजाने प्रेक्षकांच्या मनावर तिच्या अभिनयाची छाप पाडली.

या सिनेमानंतर तिने सर्कस,किसी का भाई किसी की जान’  या सिनेमातही काम केलं. परंतु, या सिनेमानंतर सलमान आणि तिच्या नात्याच्या अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या. ही जोडी एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, या चर्चांमध्ये तथ्य नसून त्या अफवा असल्याचं तिने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.

Web Title: south actress pooja hegde unknown facts worked with salman khan hritik roshan and ranveer singh in bollywood cinema 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.