२० दिवस चिमुकल्या बाळांपासून दूर होती नयनतारा; भावूक पोस्ट शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 15:27 IST2024-03-28T15:27:21+5:302024-03-28T15:27:47+5:30
Nayanthara: नयनताराने इन्स्टाग्रामवर तिच्या दोन्ही मुलांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

२० दिवस चिमुकल्या बाळांपासून दूर होती नयनतारा; भावूक पोस्ट शेअर करत म्हणाली...
दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नयनतारा. सौंदर्य आणि अभिनयकौशल्य यांच्या जोरावर लोकप्रियता मिळवणारी नयनतारा मध्यंतरी अन्नपूर्णी या तिच्या सिनेमामुळे चर्चेत आली होती. या सिनेमात भगवान श्रीरामाविषयी चुकीचा संदर्भ दिल्यामुळे हा सिनेमा अडचणीत आला होता. इतकंच नाही तर नेटफ्लिक्सवरुन देखील तो हटवण्यात आला आहे. या सिनेमानंतर नयनतारा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. परंतु, यावेळी कोणत्याही सिनेमामुळे नव्हे तर तिच्या बाळांमुळे तिची चर्चा होतीये.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या नयनताराने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तब्बल २० दिवस आपल्या लाडक्या लेकांपासून दूर राहिल्यानंतरच्या भावना व्यक्त केल्या आहेत. नयनताराने उइर आणि उलघम या दोन चिमुकल्यांसोबत काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत.
नयनतारा जवळपास २० दिवस सिंगापूरमध्ये तिच्या आगामी सिनेमाचं शूटिंग करत होती. या काळात तिच्या मुलांचा सांभाळ तिच्या कुटुंबियांनी केला. मात्र, भारतात परत आल्यानंतर लेकरांना पाहिल्यावर तिच्या अश्रूंचा बांध फुटला.
दरम्यान, '२० दिवसांच्या शेड्यूल नंतर जेव्हा मी तिघांना पाहते तेव्हा..नेमकं कसं वाटतं हे शब्दांत सांगू शकत नाही. तुम्हाला मी खूप मिस केलं', असं म्हणत नयनताराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.