'लकी भास्कर' फेम अभिनेता दुलकर सलमानची पत्नीसाठी रोमॅंटिक पोस्ट, म्हणतो- "आयुष्यभर आपण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 11:32 IST2024-12-23T11:29:43+5:302024-12-23T11:32:13+5:30
मल्याळम सुपरस्टार, अभिनेता दुलकर सलमान (Dulquer Salmaan) सध्या त्याचा 'लकी भास्कर' या सिनेमामुळे चर्चेत आला आहे.

'लकी भास्कर' फेम अभिनेता दुलकर सलमानची पत्नीसाठी रोमॅंटिक पोस्ट, म्हणतो- "आयुष्यभर आपण..."
Dulquer Salmaan: मल्याळम सुपरस्टार, अभिनेता दुलकर सलमान (Dulquer Salmaan) सध्या त्याचा 'लकी भास्कर' या सिनेमामुळे चर्चेत आला आहे. 'चूप', 'सीता रामम', 'बॅंगलोर डेज', 'चार्ली' हे त्याचे चित्रपट प्रचंड गाजले. मल्याळम चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्याने तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटदेखील केले आहेत. सलमानचे चाहते फक्त दक्षिणेतही नसून संपूर्ण देशभरात त्याची फॅनफॉलोइंग पाहायला मिळते. आपल्या सहज सुंदर अभिनयाने अभिनेत्याने त्याचा एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण केला आहे. दरम्यान, नुकतीच सलमानने सोशल मीडियावर त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
नुकतीच दुलकर सलमानच्या लग्नाला १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने अभिनेत्याने पत्नीसाठी खास रोमॅंटिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. इन्स्टाग्रामवर सलमानने पत्नीसोबतचे काही खास फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळतायत. या फोटोंमधील दोघांची केमिस्ट्री पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शिवाय अभिनेत्याने त्याच्या लेडी लव्हसाठी स्पेशल नोट देखील लिहिली आहे. त्यामध्ये अभिनेत्याने लिहिलंय, "एकमेकांना पती-पत्नी म्हणून बोलण्याची सवय लावून घेण्यापासून ते आता मरियमचे आई-बाबा म्हणून ओळखलं जाणं इथपर्यंतचा प्रवास आपण केला आहे. आता आयुष्य त्या रस्त्यांप्रमाणे झालंय जिथे मला गाडी चालवणं फारच आवडतंय. ज्यामध्ये बरेच चढ-उतार आले, वळणे आली. पण, मला असं वाटतं या सगळ्या प्रवासात जोपर्यंत तुझा हात माझ्या हातात आहे तोपर्यंत हा रस्ता आपण सहज पार करू. आयुष्यभर आपण एकमेकांचे मिस्टर आणि मिसेस बनून राहू. मी तुझ्यावर खूपच प्रेम करतो."
आपल्या पत्नीसाठी दुलकर सलमानने लिहिलेली ही पोस्टने चाहत्यांनी मनं जिंकली आहेत. शिवाय चाहते त्यांचा फोटो पाहून त्यांना 'मेड फॉर इच अदर' असं म्हणत आहेत. दरम्यान, दुलकर सलमानने २०११ मध्ये लग्नबंधनात अडकला. अमल सुफियासोबत विवाहबंधनात अडकून त्याने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरूवात केली. सध्या अभिनेता त्याच्या कौटुंबिक जीवनात व्यस्त आहे.