विजय देवरकोंडाच्या 'VD-12' च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली; 'या' दिवशी होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 15:13 IST2025-01-21T15:03:28+5:302025-01-21T15:13:01+5:30

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) अलिकडेच त्याच्या 'साहिबा' या म्युझिक व्हिडीओमुळे चांगलाच चर्चेत आला होता.

south star vijay deverakonda starrer vd12 film release date postponed says report | विजय देवरकोंडाच्या 'VD-12' च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली; 'या' दिवशी होणार प्रदर्शित

विजय देवरकोंडाच्या 'VD-12' च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली; 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Vijay Devarkonda: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) अलिकडेच त्याच्या 'साहिबा' या म्युझिक व्हिडीओमुळे चांगलाच चर्चेत आला होता. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याची जगभरात लोकप्रियता आहे. विजय देवरकोंडा कायमच त्याच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. सध्या अभिनेता त्याचा आगामी चित्रपट 'वीडी-12' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'जर्सी' चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम तिन्नानुरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. दरम्यान, या चित्रपटासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, 'वीडी-12'  च्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे. हा चित्रपट २८ मार्च २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. परंतु काही कारणास्तव याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकळण्यात आली आहे. दरम्यान, हा चित्रपट ३० मे २०२५ या दिवशी प्रदर्शित होणार असल्याची शक्यता आहे. परंतु अद्याप चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. 

'वीडी-12' या चित्रपटाचे दोन भाग असणार आहेत. पण दोन्ही भागाचं कथानक पूर्णपणे वेगळं असणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचं ८० टक्के शूट पूर्ण झालं आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडासोबत अभिनेत्री भाग्यश्री बोरसे स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 

Web Title: south star vijay deverakonda starrer vd12 film release date postponed says report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.