पहिल्यांदाच दिसला राम चरणच्या लेकीचा गोंडस चेहरा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 15:34 IST2024-03-29T15:31:39+5:302024-03-29T15:34:29+5:30
हा व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही.

पहिल्यांदाच दिसला राम चरणच्या लेकीचा गोंडस चेहरा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
अभिनेता रामचरण (Ram Charan) आणि पत्नी उपासना (Upasana Konidela) आई बाबा झाले आहेत. सध्या दोघेही आयुष्यातील या टप्प्याचा आनंद घेत आहेत. नुकतेच राम चरचरणने पत्नी उपासना आणि लेक क्लीन कारा यांच्या समवेत तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. यावेळी राम चरणच्या लाडक्या लेकीची झलक पाहायला मिळाली आहे. अभिनेत्याच्या लेकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.
रामचरण आणि उपासना यांनी लेकीला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण, चाहते राम चरणच्या लेकीचा चेहरा पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. समोर आलेला हा व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. कारण व्हिडिओत सुपरस्टारची लेक मेगा प्रिन्सेस क्लिन काराचीही झलक दिसतेयं.
राम चरण व पत्नी उपासना कोनिडेल लग्नाच्या ११ वर्षानंतर जून २०२३मध्ये आई-बाबा झाले होते. त्यानंतर दोघांनी सोशल मीडियावर लेकीचे फोटो, व्हिडीओ शेअर केले. पण त्यामधे तिचा चेहरा लपवला गेला होता. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, राम चरण सध्या त्याचा आगामी चित्रपट 'गेम चेंजर'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रामबरोबर बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी झळकणार आहे.