500 कोटींचं बजेट, राकेश मेहरांच्या सिनेमातून सूर्याचा बॉलिवूड डेब्यू? कर्णाची भूमिका साकारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 12:49 PM2023-10-06T12:49:37+5:302023-10-06T12:50:47+5:30

मात्र सूर्याचे चाहते असलेले हिंदी प्रेक्षक त्याला बॉलिवूडमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

South superstar Surya all set to make his Bollywood debut to play the role of Karna in rakesh omprakash mehra s movie | 500 कोटींचं बजेट, राकेश मेहरांच्या सिनेमातून सूर्याचा बॉलिवूड डेब्यू? कर्णाची भूमिका साकारणार

500 कोटींचं बजेट, राकेश मेहरांच्या सिनेमातून सूर्याचा बॉलिवूड डेब्यू? कर्णाची भूमिका साकारणार

googlenewsNext

साऊथ सुपरस्टार 'सूर्या' (Suriya) ज्याला आपण 'जय भीम' मधील भूमिकेमुळे खूपच लोकप्रिय झाला. या सिनेमाचं आणि सूर्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. साऊथमध्ये सूर्याचं मोठं नाव आहे. त्याचा लोक आदर करतात. हा दिग्गज अभिनेता आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करायच्या तयारित आहे. तेही 'कर्ण' (Karna) या भूमिकेतून. 'रंग दे बसंती' फेम राकेश ओम प्रकाश मेहरा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत.

माध्यम रिपोर्ट्सनुसार, 'कर्ण' हा सिनेमाची शूटिंग पुढील वर्षी सुरु होईल.   या सिनेमाचं बजेटच ५०० कोटी असणार आहे.पौराणिक कथा महाभारतातील सूर्यपुत्र 'कर्ण' या भूमिकेसाठी सूर्याची निवड झाल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच सूर्या आणि राकेश ओम प्रकाश मेहरा यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाले होते. तमिळ सुपरस्टार सूर्या सध्या 'वादी वासाल' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तसंच त्याच्या 'कंगुवा' या सिनेमाचं चित्रीकरणही अंतिम टप्प्यात आहे. यानंतर सूर्या 'कर्ण' ची तयारी करेल.

माहिती अशीही आहे की मोठ्या प्रोजेक्टखाली बनणारा 'कर्ण' हा सिनेमा २ भागांमध्ये येईल. सिनेमातील बाकी स्टारकास्टबाबत आणखी माहिती समोर आलेली नाही. तसंच सिनेमाबद्दलही अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र सूर्याचे चाहते असलेले हिंदी प्रेक्षक त्याला बॉलिवूडमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. शिवाय 'भाग मिल्खा भाग' नंतर बऱ्याच वर्षांनी राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शन करणार आहेत.

Web Title: South superstar Surya all set to make his Bollywood debut to play the role of Karna in rakesh omprakash mehra s movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.