सबकुछ जलाकर रख दूंगा! विजय देवरकोंडाच्या सिनेमाचं नवं टायटल समोर, 'VD 12' नाही तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 18:02 IST2025-02-12T18:00:01+5:302025-02-12T18:02:31+5:30

विजय देवरकोंडाच्या 'VD-12' चित्रपटाचा टीझर रिलीज, अभिनेत्याचा आजवर कधीही न पाहिलेला अ‍ॅक्शन अंदाज

southstar actor vijay devarkonda vd 12 movie new title and teaser revealed netizens react | सबकुछ जलाकर रख दूंगा! विजय देवरकोंडाच्या सिनेमाचं नवं टायटल समोर, 'VD 12' नाही तर...

सबकुछ जलाकर रख दूंगा! विजय देवरकोंडाच्या सिनेमाचं नवं टायटल समोर, 'VD 12' नाही तर...

Vijay Devarkonda:  दाक्षिणात्य अभिनेता, सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda)सध्या त्याचा आगामी चित्रपट 'VD-12' मुळे चर्चेत आहे. त्याचा हा बहुचर्चित चित्रपट तमिळ, हिंदी आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. याशिवाय चित्रपटाच्या नव्या टायटलवरून देखील पडदा हटविण्यात आलाय. 'किंगडम' असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. येत्या मे महिन्यापर्यंत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. 


अ‍ॅक्शन सीन्सने परिपूर्ण असलेला या सिनेमाचा टीझर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सितारा एंटरटेन्मेंटच्या ऑफिशिल यूट्यूब चॅनेलवर हा टीझर रिलीज करण्यात आला आहे. 'किंगडम'च्या हिंदी टीझरसाठी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने आपला आवाज दिला आहे. सुरुवातीला या टीझरमध्ये लष्कराच्या गोळीबारात अनेक लोक मारले जातात, काही पळताना दिसत आहेत. तर अनेक मृतदेह सुद्धा दिसतायत. यानंतर विजयची सिनेमॅटिक एन्ट्री आहे,  'किंगडम'च्या १ मिनिट ५६ सेकंदाच्या टीझरमध्ये विजयचा पुनर्जन्म दाखवण्यात आला आहे.

'किंगडम'चे दिग्दर्शन गौतम टिन्ननुरी यांनी केलं आहे. तसेच सितारा एंटरटेनमेंटची निर्मिती आहे. या चित्रपटाचे दोन भाग असणार आहेत. पण दोन्ही भागाचं कथानक पूर्णपणे वेगळं असणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचं ८० टक्के शूट पूर्ण झालं आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडासोबत अभिनेत्री भाग्यश्री बोरसे स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 

Web Title: southstar actor vijay devarkonda vd 12 movie new title and teaser revealed netizens react

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.