'पुष्पा २'मध्ये झळकलेली श्रीलीला लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, झळकणार या स्टारकिडसोबत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 09:16 AM2024-12-11T09:16:17+5:302024-12-11T09:16:56+5:30
Sreeleela : श्रीलीलाने 'पुष्पा २: द रुल' मधील आयटम नंबर 'किसिक' करून लोकप्रियता मिळवली आहे. आता ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ज्या प्रकारे 'पुष्पा: द राइज'(Pushpa The Rise)च्या 'उं अंटवा'ने प्रसिद्धीझोतात आली. त्याचप्रमाणे श्रीलीला(Sreeleela)ने 'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2 The Rule) मधील आयटम नंबर 'किसिक' करून लोकप्रियता मिळवली आहे. पण तिच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. श्रीलीला सध्या २३ वर्षांची आहे. श्रीलीला लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बॉलिवूडच्या नव्या स्टार किडसोबत ती मुख्य भूमिका साकारणार आहे. स्टारकिडचा हा दुसरा चित्रपट असेल. तर श्रीलीलाचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असेल. याशिवाय ती तेलुगू इंडस्ट्रीतील स्टार कलाकारांसोबत काम करत आहे. श्रीलीलाचा तेलगू स्टारसोबतचा चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होत आहे. हा संपूर्ण पॅन इंडिया चित्रपट आहे.
श्रीलीला तेलगू स्टार नितीनसोबत 'रॉबिनहूड' चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाची दोन गाणीही आली आहेत. या ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'पुष्पा २'ने लोकप्रियता मिळवल्यानंतरचा हा तिचा पहिलाच चित्रपट असेल. डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार, हा चित्रपट ६० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. नितीनच्या आधी श्रीलीलाने महेश बाबू, नंदमुरी बालकृष्ण आणि रवी तेजा यांच्यासह अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. तिच्या चित्रपट कारकिर्दीला नुकतीच ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. इतक्या कमी कालावधीत तिने इंडस्ट्रीतील बड्या अभिनेत्रींपेक्षा जास्त लोकप्रियता मिळवली आहे.
श्रीलीला झळकणार या स्टार किडसोबत
यानंतर श्रीलीला बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. हा तिचा डेब्यू चित्रपट असून ती इब्राहिम अली खानसोबत दिसणार आहे. होय, ती सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमचा दुसरा चित्रपट 'दिलर'मध्ये दिसणार आहे. 'दिलर' हा स्पोर्ट्स ड्रामा आहे जो एका मॅरेथॉन धावपटूची कथा सांगतो. ऑगस्टमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये होणार होते, परंतु यूकेमध्ये वाढता तणाव आणि विरोध यामुळे चित्रपटाचे निर्माते दिनेश विजान यांनी लंडनचे वेळापत्रक रद्द केले. 'दिलर'च्या शूटिंगदरम्यान श्रीलीला आणि इब्राहिम अली खान यांच्यातील केमिस्ट्री चांगलीच रंगली होती.
इब्राहिम अली खान या सिनेमातून करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण
इब्राहिम अली खान काजोल आणि पृथ्वीराज सुकुमारन स्टारर 'सरजमीन' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. हा चित्रपट जानेवारी २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिनेते बोमन इराणी यांचा मुलगा कयोज इराणीने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.