आली लहर केला कहर... KGF 3 मध्ये येणार मोठा ट्विस्ट, आणखी एका सुपरस्टारची होणार एन्ट्री ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 12:53 PM2024-07-25T12:53:59+5:302024-07-25T12:54:17+5:30

'KGF Chapter 3'बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. 

superstar Ajith Kumar To Join Yash Starrer Director Prashanth Neel's KGF 3 | आली लहर केला कहर... KGF 3 मध्ये येणार मोठा ट्विस्ट, आणखी एका सुपरस्टारची होणार एन्ट्री ?

आली लहर केला कहर... KGF 3 मध्ये येणार मोठा ट्विस्ट, आणखी एका सुपरस्टारची होणार एन्ट्री ?

कन्नड अभिनेता यशच्या 'KGF Chapter 1' आणि  'KGF Chapter 2' या दोन चित्रपटांच्या तुफान यशानंतर आता प्रेक्षकांना तिसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाचे पहिले दोन भाग ब्लॉकबस्टर ठरले.  'KGF Chapter 2' चा शेवट अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर झाला होता. याच चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये तिसऱ्या भागाची हिंट देण्यात आली होती. तेव्हापासून प्रेक्षकांना तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. यातच आता  'KGF Chapter 3'बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. 

दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या  'KGF Chapter 3' या चित्रपटात आणखी एका सुपरस्टारची एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. तो सुपरस्टार हा अजित कुमार असल्याचं बोललं जात आहे. नुकतंच अजित कुमारनं दिग्दर्शक प्रशांत नील यांची भेट घेतली. दोघेही 'KGF Chapter 3' साठी एकत्र काम करण्याची शक्यता आहे. अर्थात गरुडा आणि अधीरानंतर आता अजित हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 


चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील सध्या यावर काही सांगत नसले तरी 'KGF Chapter 3' या चित्रपटाच्या पटकथेत नक्कीच काही तरी वेगळं पाहायला मिळणार आहे. दरम्यान, KGF चा पहिला पार्ट 2018 मध्ये रिलीज झाला होता आणि त्यानंतर आता चित्रपटाचा दुसरा पार्ट 2022 मध्ये रिलीज झाला होता. दोन्ही भागांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. आता 'KGF Chapter 3'साठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

Web Title: superstar Ajith Kumar To Join Yash Starrer Director Prashanth Neel's KGF 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.