सुपरस्टार पवन कल्याणच्या पत्नीने ४३ व्या वर्षी पूर्ण केलं ग्रॅज्युएशन, या विषयात घेतली डिग्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 03:10 PM2024-07-23T15:10:06+5:302024-07-23T15:13:46+5:30

सुपरस्टार पवन कल्याणच्या पत्नीने या खास विषयात मिळवली डिग्री. सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय (pavan kalyan)

superstar pavan kalyan wife completed her graduation at the age of 43 singapor university ma | सुपरस्टार पवन कल्याणच्या पत्नीने ४३ व्या वर्षी पूर्ण केलं ग्रॅज्युएशन, या विषयात घेतली डिग्री

सुपरस्टार पवन कल्याणच्या पत्नीने ४३ व्या वर्षी पूर्ण केलं ग्रॅज्युएशन, या विषयात घेतली डिग्री

दक्षिणेतील सुपरस्टार आणि राजकारणी पवन कल्याणने नुकताच आंध्र प्रदेशमधील लोकसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवला होता. या विजयानंतर त्याच्या आयुष्यात आणखी एक गुडन्यूज आलीय. पवन कल्याणच्या आनंदाचे कारण म्हणजे त्याच्या पत्नीने तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे. पवन कल्याणची पत्नी ॲना लेझनेवा ग्रॅज्युएट झाली आहे. त्यामुळे पवनने ॲनासोबतचा खास फोटो पोस्ट करुन तिचं अभिनंदन केलंय

ॲना लेझनेवा पदवीधर झाली

पवन कल्याणची पत्नी ॲना लेझनेवाने सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीमधून मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी घेतली आहे. तिच्या पदवीदान समारंभाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डिग्री घेण्यासाठी ॲनाला घेण्यासाठी कॉलेजच्या स्टेजवर बोलावण्यात आले आहे. या सोहळ्याला पवन कल्याणसुद्धा पत्नीचं कौतुक करण्यासाठी उपस्थित होता. 

२०१३ साली झालं पवनचं लग्न

पवन आणि त्याच्या पत्नीने कॅमेऱ्यासाठी पोज देतानाचा एक फोटोही ऑनलाइन व्हायरल होत आहे. फोटोमध्ये ॲना तिचे डिग्री प्रमाणपत्र दाखवताना दिसत आहे. पवन कल्याणने २०१३ मध्ये रशियन मॉडेल ॲना लेझनेवाशी लग्न केले होते. २०१७ मध्ये त्यांना दोन मुलं झाली. याआधी २००९ मध्ये पवनने रेणू देसाईसोबत लग्न केले होते. पवनचे हे लग्न फार काळ टिकले नाही आणि २०१२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

 

Web Title: superstar pavan kalyan wife completed her graduation at the age of 43 singapor university ma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.