बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर रजनीकांत यांचा 'जेलर' या देशात होणार प्रदर्शित, चाहते उत्सुक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 16:11 IST2025-02-20T16:09:53+5:302025-02-20T16:11:48+5:30

दिग्गज बॉलिवूड अभिनेते, सुपरस्टार रजनीकांत गेली अनेक वर्ष मनोरंजनविश्वात सक्रिय आहेत.

superstar rajinikanth jailer movie released in japan soon know about the date | बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर रजनीकांत यांचा 'जेलर' या देशात होणार प्रदर्शित, चाहते उत्सुक 

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर रजनीकांत यांचा 'जेलर' या देशात होणार प्रदर्शित, चाहते उत्सुक 

Rajinikanth Jailer Movie: दिग्गज बॉलिवूड अभिनेते, सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) गेली अनेक वर्ष मनोरंजनविश्वात सक्रिय आहेत. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना भुरळ घालते. दक्षिणेतील राज्यांमध्ये या चित्रपटाची तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. दरम्यान, रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेला 'जेलर' हा चित्रपट १० ऑगस्ट २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं कथानक त्यातील गाण्यांना प्रेक्षकांनी अक्षरश  डोक्यावर घेतलं होतं. ‘जेलर’ चित्रपटामध्ये रजनीकांत ‘जेलर’  मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत पाहायला मिळाले. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. अशातच जेलर संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, 'जेलर' अ‍ॅक्शन थ्रिलर हा चित्रपट इंडियन बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता जापानमध्ये प्रदर्शित केला जाणाार आहे. येत्या २१ फेब्रुवारी २०२५ हा सिनेमाजपानमध्ये रिलीज करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या जेलर या चित्रपटाचं दिग्दर्शन नेल्सन यांनी केलं होतं. दरम्यान, या चित्रपटात राम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन, योगी बाबू यांच्याही भूमिका आहेत आणि मोहनलाल आणि जॅकी श्रॉफ यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title: superstar rajinikanth jailer movie released in japan soon know about the date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.