गेट वेल सून! सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, समोर आलं मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 09:25 AM2024-10-01T09:25:01+5:302024-10-01T09:25:42+5:30

भारतीय मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते रजनीकांत यांना मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय (rajinikanth)

superstar Rajinikanth was admitted to a hospital on Monday after he complained of severe stomach pain | गेट वेल सून! सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, समोर आलं मोठं कारण

गेट वेल सून! सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, समोर आलं मोठं कारण

सुपरस्टार म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एकच शब्द येतो तो म्हणजे रजनीकांत.रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रात्री उशीरा रजनीकांत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गोष्ट समोर येतेय. त्यामुळे रजनीकांत यांच्या चाहत्यांना चिंता लागून राहिली आहे. रजनीकांत यांना तत्काळ रुग्णालयात का दाखल करण्यात आलं, याचं कारणही समोर आलंय. जाणून घ्या सविस्तर

म्हणून रजनीकांत रुग्णालयात दाखल 

काही मीडिया रिपोर्टनुसार रजनीकांत यांना मध्यरात्री पोटदुखी सुरु झाली होती. याशिवाय रिपोर्टनुसार रजनीकांत यांना ब्लड प्रेशरचा त्रासही सुरु झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज १ ऑक्टोबरला रजनीकांत यांच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात येणार आहेत. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये रजनीकांत यांना दाखल करण्यात आलं. आता त्यांची प्रकृती ठीक असून काही वैद्यकीय तपासण्या करुन त्यांना घरीही सोडण्यात येईल.


रजनीकांत यांचं वर्कफ्रंट

रजनीकांत यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर 'वेट्टैयान' हा रजनीकांत यांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रजनीकांत अनेक वर्षांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम  करणार आहेत. 'वेट्टैयान' हा रजनीकांत यांचा १७० वा सिनेमा आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा या सिनेमाचा टीझर रिलीज झाला तेव्हा प्रेक्षकांनी त्याला चांगलीच पसंती दिली. १० ऑक्टोबरला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात 'आवेशम' स्टार फहाद फाजिल सुद्धा दिसणार आहे.

Web Title: superstar Rajinikanth was admitted to a hospital on Monday after he complained of severe stomach pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.