एक दोन नाही तब्बल 38 भाषांमध्ये प्रदर्शित होणार सुर्याचा 'कंगुवा' हा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 03:41 PM2023-11-22T15:41:07+5:302023-11-22T15:46:49+5:30

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता सूर्याचा 'कांगुवा' 38 भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

Suriya's movie 'Kanguwa' will be released in as many as 38 languages | एक दोन नाही तब्बल 38 भाषांमध्ये प्रदर्शित होणार सुर्याचा 'कंगुवा' हा चित्रपट

एक दोन नाही तब्बल ३८ भाषांमध्ये प्रदर्शित होणार सुर्याचा 'कंगुवा' हा चित्रपट

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता सूर्या सध्या प्रचंड चर्चेत आहे. सूर्या आपल्या अभिनयाच्या बळावर आज प्रसिद्ध अभिनेता बनला आहे. लवकच तो 'कंगुवा' चित्रपटात दिसणार आहे.  सुर्याचा 'कांगुवा' चित्रपटामधील लूक नुकतेच त्याच्या वाढदिवशी रिव्हिल करण्यात आला होता. यानंतर चाहते चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. . आता निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भात एक नवीन अपडेट दिले आहे.

'कांगुवा' चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी 38 भाषांची निवड केली आहे. सूर्याचा 'कांगुवा' 38 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय हा चित्रपट सर्व भाषांमध्ये थ्रीडी आणि आयमॅक्स फॉरमॅटमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही बोलले जात आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात आहे. 

यापूर्वी 'कांगुवा' 10 भारतीय भाषांमध्ये रिलीज होणार होता, मात्र तो 38 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये रिलीज होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. या चित्रपटात योगी बाबू, किंग्सले, कोवई सरला, आनंद राज आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

 सुर्याने ‘कादल निम्माधी’, ‘कृष्णा’, ‘श्री’, ‘काका काका’, ‘सिंघम’, ‘निनातू यारो’, ‘अंजान’, ‘कल्याणरामन’, ‘24’, ‘जय भीम’, ‘सूरराय पोतरू’ यासह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये कॉलेज की लड़कीकाम केले आहे. आता 'कंगुवा' या चित्रपटामधील सूर्याचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
 

Web Title: Suriya's movie 'Kanguwa' will be released in as many as 38 languages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.