भारताने वर्ल्डकप जिंकल्यास न्यूड होऊन धावेन म्हणणारी अभिनेत्री ट्रोल, नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 16:34 IST2023-11-17T16:33:59+5:302023-11-17T16:34:49+5:30
"जर भारताने वर्ल्डकप जिंकला तर मी बीचवर न्यूड होऊन धावेन", प्रसिद्ध अभिनेत्रीचं बोल्ड वक्तव्य

भारताने वर्ल्डकप जिंकल्यास न्यूड होऊन धावेन म्हणणारी अभिनेत्री ट्रोल, नेटकरी म्हणाले...
सध्या सगळीकडे वर्ल्डकपचा थरार पाहायला मिळत आहे. रविवारी(१९ नोव्हेंबर) वर्ल्ड कप २०२३चा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडला धूळ चारलेल्या टीम इंडियाचा सामना फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. वर्ल्डकपच्या फायनलसाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने वर्ल्डकपबाबत बोल्ड वक्तव्य केलं आहे.
तेलुगु अभिनेत्री रेखा बोज हिने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने "भारताने वर्ल्डकप जिंकल्यास मी विगाझ बीचवर स्ट्रीकिंग करेन", असं म्हटलं आहे. ही पोस्ट शेअर करताना तिने टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. परदेशात एखादी मोठ्या गोष्टींचा आनंदोत्सव साजरा करण्याला स्ट्रिकिंग असं म्हणतात. यामध्ये न्यूड होत बीचवर धावून आनंद व्यक्त केला जातो. रेखाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
एकाने कमेंट करत "हा पब्लिसिटी स्टंट आहे," असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "टीम इंडियाच्या नावावर अटेंशन घेण्यासाठी वायफळ बडबड सुरू आहे," अशी कमेंट केली आहे. "याची काहीच गरज नाही, बाकी तुझी मर्जी", असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. रेखाने ‘मंगल्यम’, ‘स्वाती चिनुकू संध्या लेलेलो’ आणि ‘कलाय तस्मै नमः’ या तेलुगु चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टच्या पोस्टबरोबरच अनेकदा ती बोल्ड फोटोही शेअर करताना दिसते. रेखाने वर्ल्ड कपबाबत केलेल्या पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे.