तेलुगू फिल्म दिग्दर्शक सूर्य किरण यांचं निधन, वयाच्या 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 06:28 PM2024-03-11T18:28:16+5:302024-03-11T18:32:43+5:30
Tollywood Director Surya Kiran Death: सूर्य किरण यांनी 'सत्यम' आणि 'धाना 51' सारखे चित्रपट केले आहेत.
तेलुगू इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक सूर्य किरण (Surya Kiran) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 48 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. चेन्नई मधील राहत्या घरीच त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. सोमवारी त्यांना जाँडिसचेही निदान झाले. त्यांच्यावर चेन्नईच्या जीईएम रुग्णालयात उपचार सुरु होते.
सूर्य किरण यांनी 'सत्यम' आणि 'धाना 51' सारखे चित्रपट केले आहेत. दिग्दर्शनात क्षेत्रात त्यांचं मोठं नाव होतं. तसंच बिग बॉसमध्येहीव ते सहभागी झाले होते. किरण यांनी बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी 'मौना गीतांगल' आणि 'पादुकाथवन' सह २०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं. २००३ साली त्यांनी 'सत्यम' सिनेमातून दिग्दर्शनात पाऊल ठेवलं. यामध्ये सुमंत अक्किनेनी आणि जिनिलिया डिसुझा मुख्य भूमिकेत होते. या सिनेमामुळे त्यांना ओळख मिळाली.
Director #SuryaKiran has passed away due to jaundice.
— Suresh PRO (@SureshPRO_) March 11, 2024
He directed telugu films, Satyam, Raju Bhai and a few others. He was also a former contestant on Biggboss Telugu.
Om Shanti. pic.twitter.com/CrDctCs9UZ
सूर्य किरण यांनी अभिनेत्री कल्याणीसोबत लग्न केले होते. मात्र काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. नुकतंच त्यांनी पुन्हा इंडस्ट्रीत कमबॅक केलं होतं. लवकरच ते एका सिनेमाचं काम सुरु करणार होते. मात्र त्याआधीच त्यांचं निधन झालं.