पांढरे कपडे, टोपी अन् नमाज पठाण; थलपती विजयची इफ्तार पार्टी, साऊथ स्टारने केला रोजाचा उपवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 10:46 IST2025-03-08T10:45:44+5:302025-03-08T10:46:26+5:30
थलपती विजय अभिनयाला रामराम करत आता राजकारणात सक्रिय झाला आहे. त्याने त्याच्या पॉलिटिकल पार्टीतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं.

पांढरे कपडे, टोपी अन् नमाज पठाण; थलपती विजयची इफ्तार पार्टी, साऊथ स्टारने केला रोजाचा उपवास
आठवड्याभरापूर्वीच रमजानचा महिना सुरू झाला आहे. अनेक सेलिब्रिटी धर्माचं पालन करत रोजाचा उपवास करतात. साऊथ स्टार थलपती विजयनेही रोजाचा उपवास ठेवला होता. थलपती विजय अभिनयाला रामराम करत आता राजकारणात सक्रिय झाला आहे. त्याने त्याच्या पॉलिटिकल पार्टीतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं.
या इफ्तार पार्टीसाठी थलपती विजयने एक दिवसाचा रोजाचा उपवास केला होता. शुक्रवारी(७ मार्च) थलपती विजयने चेन्नई येथे इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. मिडिया रिपोर्टनुसार, या इफ्तार पार्टीत १५ मस्जिदमधील मुस्लिम बांधवांना आमंत्रित केलं गेलं होतं. तिथे ३ हजार लोकांची राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. या इफ्तार पार्टीतील काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
Thalapathy Vijay! HD Stills 📸.#TVKVijay@actorvijay ❤️🙇♂️ pic.twitter.com/FEe8lCIewj
— Տri βσσραℓαη ツ (@BoopalanVJ) March 7, 2025
व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये थलपती विजयने पांढऱ्या रंगाचे कपडे घातल्याचं दिसत आहे. त्याबरोबरच मुस्लिम बांधव परिधान करतात तशी स्कल टोपीही त्याने घातली आहे. थलपती विजयने मुस्लिम बांधवांसोबत नमाज पठण करत रोजाचा उपवास सोडला. दरम्यान, थलपती विजय अलिकडेच प्रदर्शित झालेल्या द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम (GOAT) या सिनेमात दिसला होता. आता तो 'जन नायकन' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.