'रामलीला' सिनेमाच्या निर्मात्याचं निधन, आर्थिक समस्यांमुळे उचलले टोकाचे पाऊल?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 05:08 PM2024-04-14T17:08:26+5:302024-04-14T17:10:30+5:30
भारतीय मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध निर्मात्यांचं निधन झालं आहे. आर्थिक कारणांमुळे त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं अशी चर्चा आहे
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येतेय. प्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माता सौंदर्या जगदीश यांचं निधन झालं आहे. सौंदर्याच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली असून सर्वांना धक्का बसलाय. आर्थिक नुकसान झाल्याने सौंदर्या यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याचा संशय आहे. परंतु त्यांच्या कुटुंबाने सौंंदर्या यांनी आत्महत्या केल्याचं खंडन केलंय.
News 24 Online च्या वृत्तांवर विश्वास ठेवला तर, सौंदर्या जगदीशने त्याच्याच घरात आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. सौंदर्या जगदीशचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला, असं कुटुंबियांचं म्हणणं आहे. त्यामुळे सौंदर्याने आत्महत्या केली आहे की नाही, याची पुष्टी अद्याप झालेली नाही.
Filmmaker Soundarya Jagadish who has produced films like Ram Leela and Soundarya had died by suicide at his residence. It is reported that financial loss made him take such an extreme stop #SoundaryaJagadish#Suicide#Sandalwood#KFIpic.twitter.com/BQwAa81ptz
— Bangalore Times (@BangaloreTimes1) April 14, 2024
सौंदर्या जगदीश यांनी चित्रपटसृष्टीत खूप महत्त्वाचे योगदान दिलं आहे. त्यांनी 'अप्पू पप्पू', 'रामलीला' आणि 'स्नेहितरू' सारख्या उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली आहे. जगदीशने यांनी आपल्या कारकिर्दीत उत्कृष्ट काम केलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्यांचे कुटुंबीय आत्महत्येचा दावा नाकारत आहेत. आता या प्रकरणाचा अधिक तपास केल्यावर सत्याचा उलगडा होईल.