The Raja Saab ची रिलीज डेट ढकलली पुढे, प्रभासचा हॉरर सिनेमा पाहण्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 19:26 IST2024-12-18T19:25:58+5:302024-12-18T19:26:35+5:30

The Raja Saab Movie : एप्रिल महिन्यात 'द राजा साहेब' चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, अशी प्रेक्षकांना अपेक्षा होती. पण आता ती पुढे ढकलल्याच्या बातमीने चाहत्यांची निराशा झाली आहे.

The Raja Saab's release postponed, will have to wait to watch Prabhas' horror movie | The Raja Saab ची रिलीज डेट ढकलली पुढे, प्रभासचा हॉरर सिनेमा पाहण्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा

The Raja Saab ची रिलीज डेट ढकलली पुढे, प्रभासचा हॉरर सिनेमा पाहण्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा

साउथ सुपरस्टार प्रभास(Prabhas)च्या कल्की 2898 एडी (Kalki 2898 AD) या चित्रपटाने यावर्षी बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन केले होते. या चित्रपटानंतर अभिनेता त्याच्या 'द राजा साहेब' (The Raja Saab Movie) या नवीन प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाचे मोशन पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले. पोस्ट पाहिल्यानंतर चाहते खूप उत्साहित झाले. एप्रिल महिन्यात हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, अशी प्रेक्षकांना अपेक्षा होती. पण आता ती पुढे ढकलल्याच्या बातमीने चाहत्यांची निराशा झाली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक मनोबाला विजय बालन यांनी 'द राजे साहेब'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचे ट्विट करून सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे. मात्र, निर्मात्यांनी असे करण्यामागचे कारण स्पष्ट केले नाही. निर्मात्यांनी सध्या कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. मात्र प्रभासचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना बरीच प्रतीक्षा करावी लागणार हे निश्चित.

शूटिंगदरम्यान अभिनेता झाला होता जखमी 
सध्या प्रभास राघवपुडीच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काल, शूटिंगच्या मध्येच त्याच्या घोट्याला दुखापत झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र, दुखापतीचे खरे कारण समोर आलेले नाही. यामुळे, तो जपानमध्ये कल्की 2898 AD च्या प्रमोशनमध्ये सहभागी होऊ शकला नाही. अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांची माफी मागितली होती आणि म्हटले होते की, माझ्यावर आणि माझ्या कामावर इतके प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. मी खूप दिवसांपासून जपानला जाण्याची वाट पाहत होतो. मात्र, मला सांगायला खूप वाईट वाटतं की शूटिंगदरम्यान माझा पाय मुरगळला आणि तिथे जाता आले नाही. अभिनेता म्हणाला, 'कल्की 2898 एडी' ३ जानेवारीला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. मला आशा आहे की आम्ही तुम्हाला लवकरच भेटू.

वर्कफ्रंट
'द राजा साहेब' व्यतिरिक्त प्रभास राघवपुडीच्या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव फौजी असण्याची शक्यता आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. त्यात इमान इस्माईल उर्फ ​​इमानवी देखील दिसणार आहे. हा चित्रपट सुभाषचंद्र बोस यांच्या काळावर आधारित ऐतिहासिक नाटक आहे.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर प्रभास स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश लष्करातील सैनिकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचीही चर्चा होती. मात्र अभिनेत्रीने ती या चित्रपटाचा भाग नसल्याचे सांगितले होते.

Web Title: The Raja Saab's release postponed, will have to wait to watch Prabhas' horror movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Prabhasप्रभास