'हॉरर'प्रेमी असला तर आवर्जून पाहाच! OTT वरील 'हा' चित्रपट हादरवून सोडेल, उडेल रात्रीची झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 10:12 IST2025-02-26T10:10:37+5:302025-02-26T10:12:09+5:30

या चित्रपटात तुम्हाला श्रद्धा आणि विज्ञानाचा एक अद्भुत संगम पाहायला मिळेल. 

Trending South Thriller Movie Gaami Watch On Ott Prime Video | 'हॉरर'प्रेमी असला तर आवर्जून पाहाच! OTT वरील 'हा' चित्रपट हादरवून सोडेल, उडेल रात्रीची झोप

'हॉरर'प्रेमी असला तर आवर्जून पाहाच! OTT वरील 'हा' चित्रपट हादरवून सोडेल, उडेल रात्रीची झोप

Superhit Horror Movies: हॉरर सिनेमांचा मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग आहे. असे अनेक सिनेमे आहेत, ज्यांची प्रेक्षकांच्या मनावर गडद छाप पडलेली आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक हॉरर, थ्रिलर आणि सस्पेन्स चित्रपट पाहिले असतील, पण आज आम्ही तुम्हाला एका हॉरर थ्रिलर चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो पाहिल्यानंतर तुमचा थरकाप उडेल. हा एक दाक्षिणात्य चित्रपट आहे.  या सिनेमाचं शुटिंग हे २०१८ मध्ये सुरू झालं आणि सुमारे ६ वर्षे त्याचं शुटिंग सुरु होतं.  या कथेत असे ट्विस्ट आणि टर्न्स आहेत, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.

हा चित्रपट २०२४ मध्ये म्हणजेच प्रदर्शित झाला होता. तो आता तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता. सिनेमात दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते विश्वक सेन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. विश्वक व्यतिरिक्त अभिनेत्री रम्याही चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचं नाव आहे 'गामी' (Gaami). चित्रपटात तुम्हाला श्रद्धा आणि विज्ञानाचा एक अद्भुत संगम पाहायला मिळेल. हा चित्रपट फक्त १५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २२.८० कोटींची कमाई केली.  

'गामी'मध्ये ओळख गमावलेल्या एका व्यक्तीची कहानी पाहायला मिळते. विश्वक सेनने शंकर नावाच्या अघोरीची भूमिका साकारली आहे. जो एका आजाराने ग्रस्त आहे, ज्यामुळे तो कोणत्याही माणसाचा स्पर्श सहन करू शकत नाही.  हिमालयातील द्रोणगिरी टेकड्यांवर आढळणाऱ्या मालीच्या पानांचा वापर करून आपण बरे होऊ शकतो, हे त्याला कळतं अणि मग तो हिमालयाच्या दिशेने निघतो. पण, या प्रवासात त्याच्यासोबत विविध गोष्टी घडतात. 

Web Title: Trending South Thriller Movie Gaami Watch On Ott Prime Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.