'मी लग्न करणार नाही, पण...' रश्मिकासोबत लग्न करण्यावर अखेर विजयने सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 10:14 IST2024-01-21T10:12:50+5:302024-01-21T10:14:26+5:30
Vijay devarkonda: विजयने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने पहिल्यांदाच रश्मिकासोबतच्या नात्यावर भाष्य केलं आहे.

'मी लग्न करणार नाही, पण...' रश्मिकासोबत लग्न करण्यावर अखेर विजयने सोडलं मौन
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा (vijay devarkonda) आणि रश्मिका मंदान्ना (rashmika mandanna) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच ही जोडी साखरपुडा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे या चर्चांवर रश्मिका आणि विजय या दोघांनीही मौन बाळगलं होतं. मात्र, या चर्चांनी जोर धरल्यानंतर अखेर विजयने त्याचं मौन सोडलं आहे. इतकंच नाही तर मी फेब्रुवारीमध्ये लग्न करणार नाही, असं स्पष्टीकरणही त्याने दिलं आहे.
रश्मिका आणि विजय यांच्या साखरपुड्याच्या चर्चा रंगत असतानाच अभिनेत्याने 'लाइफस्टाइल एशिया'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने रश्मिकासोबत लग्न करण्याविषयी भाष्य केलं आहे. इतकंच नाही तर माध्यमांमध्ये दर २ महिन्यांनी माझं लग्न होतं, असंही मी मिश्किलपणे म्हणाला.
विजय देवरकोंडा करणार नाही लग्न?
"मी फेब्रवारीमध्ये साखरपुडा किंवा लग्न असं काहीही करणार नाहीये. या अफवा मी दरवर्षी ऐकतो. माध्यमांमध्ये दर दोन महिन्यांनी माझं लग्न होत असतं. ते फक्त माझ्या लग्नाची वाट पाहत आहेत", असं विजय म्हणाला.
दरम्यान, विजयने दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर रंगलेल्या त्याच्या साखरपुड्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. विशेष म्हणजे मध्यंतरी विजय आणि रश्मिका ही जोडी परदेशात एकत्र दिसले होते. इतकंच नाही तर विमानतळावरही त्यांना वेगवेगळं जातांना स्पॉट करण्यात आलं. मात्र, प्रत्यक्षात त्या दोघांनी एकाच ठिकाणचे फोटो शेअर केले होते. तेव्हापासून सोशल मीडियावर त्याच्या नात्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.