लंगडतच बाहेर आली रश्मिका, विजय देवरकोंडाला मदत करता येत नाही का?; भडकले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 17:21 IST2025-02-04T17:21:10+5:302025-02-04T17:21:54+5:30

विजय गाडीत बसला तर मागून रश्मिका...अभिनेता होतोय ट्रोल

vijay deverakonda getting trolled for not helping rashmika mandanna while she was trying to walk due to injury | लंगडतच बाहेर आली रश्मिका, विजय देवरकोंडाला मदत करता येत नाही का?; भडकले नेटकरी

लंगडतच बाहेर आली रश्मिका, विजय देवरकोंडाला मदत करता येत नाही का?; भडकले नेटकरी

विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही सध्याचं मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कपल. दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेकदा दोघंही एकमेकांना लपूनछपून भेटताना दिसतात. कधी कॅफे मध्ये सोबत असतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर कधी दोघंही मालदीव व्हॅकेशनवर गेले आहेत. तिथून सारख्याच लोकेशनवरुन त्यांनी वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत. दरम्यान विजय देवरकोंडा सर्व तरुणींच्या गळ्यात ताईत असताना आता मात्र एका कारणामुळे ट्रोल होतोय.

रश्मिका मंदानाच्या पायाला दुखापत झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती लंगडतच चालत आहे. 'छावा'च्या प्रमोशनलाही ती अशीच आली. नुकताच रश्मिका आणि विजयचा रेडिटवर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोघंही एका इमारतीतून बाहेर पडत आहेत. आधी विजय बाहेर पडतो आणि कारमध्ये बसतो. मागून रश्मिका वॉकर घेऊन लंगडत लंगडतच येते. विजय तिला मदत करु शकत नाही का असं म्हणून त्याला ट्रोल करण्यात येत आहे. रेडिटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

Rashmika and Vijay spotted together
byu/Glad-Ad5911 inBollyBlindsNGossip

विजय आणि रश्मिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 'विजय तिची मदत करु शकला असता','हे मी काय बघतोय' अशा कमेंट्स व्हिडिओवर आल्या आहेत. विजय आणि रश्मिका गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 'गीता गोविंदम','डिअर कॉम्रेड' या सिनेमांमध्ये ते एकत्र दिसले आहेत. 

Web Title: vijay deverakonda getting trolled for not helping rashmika mandanna while she was trying to walk due to injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.