"आईला नातवंडांचं तोंड बघायचंय पण मी..." लग्नाबाबतीत विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 10:24 AM2023-08-26T10:24:28+5:302023-08-26T10:25:40+5:30

नुकतंच विजयने घरातील मंडळी लग्नासाठी खूपच मागे लागली आहेत असा खुलासा केला.

vijay deverakonda have pressure to get married from his family his mother want to see grandchildren s face | "आईला नातवंडांचं तोंड बघायचंय पण मी..." लग्नाबाबतीत विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया चर्चेत

"आईला नातवंडांचं तोंड बघायचंय पण मी..." लग्नाबाबतीत विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया चर्चेत

googlenewsNext

अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) म्हणजे तरुणींचा लाडका अभिनेता. त्याच्या लुक्समुळे अनेक तरुणी त्याच्यावर फिदा असतात. रश्मिका मंदानासोबतही त्याचं नाव जोडलं जातं. सध्या तो त्याचा आगामी सिनेमा 'खुशी' मुळे चर्चेत आहे. या सिनेमात समंथा प्रभूसोबत त्याची जोडी आहे. नुकतंच विजयने घरातील मंडळी लग्नासाठी खूपच मागे लागली आहेत असा खुलासा केला. एका शोमध्ये विजय पाहुणा म्हणून आला होता तिथे त्याने याबाबत संवाद साधला.

आईला नात-नातू हवे

विजय म्हणाला, 'सध्या मला घरातून लग्नासाठी खूप दबाव आहे. माझ्या आईला नातवांचं तोंड बघायचं आहे. पण लग्न करण्यासाठी माझ्या काही अटी आहेत. मला अरेंज मॅरेज करायचं नाही. आधी मला मुलीशी ओळख करुन घ्यायची आहे, तिच्यासोबत वेळ घालवायचा आहे तेव्हाच मी निर्णय घेऊ शकतो. तसंच त्या मुलीचं माझ्या कुटुंबासोबतही जमलं पाहिजे विशेषत: माझ्या आईसोबत चांगला बाँड झाला पाहिजे.'

विजयने लग्नाबाबत केलेल्या या खुलासानंतर मनोरंजनसृष्टीत एकच चर्चा सुरु झाली आहे. रश्मिका आणि विजयचं ब्रेकअप झाल्याची चर्चा मध्यंतरी उठली होती. आता विजयच्या आयुष्यात नक्की कोण आहे याची चाहत्यांना उत्सुकता आहे. सध्या विजय 'खुशी' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.सिनेमाचं ट्रेलर आणि गाणी सर्वांच्याच पसंतीस पडले आहेत.विजय आणि समंथा ही जोडी आधीही एकत्र दिसली आहे. पुन्हा त्यांना मोठ्या पडद्यावर बघण्यास चाहते उत्सुक आहेत.

Web Title: vijay deverakonda have pressure to get married from his family his mother want to see grandchildren s face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.