अफेअरच्या चर्चांदरम्यान रश्मिकाच्या डीपफेक व्हिडिओवर विजय देवराकोंडाने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कोणाबरोबरही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 04:36 PM2023-11-08T16:36:47+5:302023-11-08T16:37:25+5:30

रश्मिकाच्या व्हायरल व्हिडिओबाबत अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली होती. आता दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडाने याबाबत भाष्य केलं आहे. 

Vijay Deverakonda react on Rashmika mandanna deepfake viral video amid rumors of affair | अफेअरच्या चर्चांदरम्यान रश्मिकाच्या डीपफेक व्हिडिओवर विजय देवराकोंडाने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कोणाबरोबरही..."

अफेअरच्या चर्चांदरम्यान रश्मिकाच्या डीपफेक व्हिडिओवर विजय देवराकोंडाने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कोणाबरोबरही..."

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एका इन्फ्लुएन्सचा व्हिडिओ एडिट करून त्यात रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला होता. रश्मिकाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. एका युजरने हा व्हिडिओ शेअर करत त्यामागचं सत्य सांगितलं होतं. रश्मिकाच्या या व्हायरल व्हिडिओबाबत अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली होती. आता दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडाने याबाबत भाष्य केलं आहे. 

विजयने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये रश्मिकाच्या व्हायरल झालेल्या डीपफेक व्हिडिओची एक पोस्ट शेअर केली आहे. सरकारने रश्मिकाच्या व्हिडिओबाबत घेतलेल्या अॅक्शनबाबत ही पोस्ट आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने "भविष्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल आहे. हे कोणाबरोबरही घडता कामा नये. अशा घटना थांबवण्यासाठी आणि दोषींना योग्य ती शिक्षा देण्यासाठी सायबर विंग असलं पाहिजे," असं म्हटलं आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रश्मिका आणि विजय एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता अफेअरच्या चर्चांदरम्यान देवराकोंडाने रश्मिकाच्या व्हायरल व्हिडिओबाबत पोस्ट केल्याने पुन्हा त्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 

रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कतरिना कैफचा एक मॉर्फ फोटोही व्हायरल झाला होता. या फोटोत कतरिनाला विचित्र कपडे घालण्यात आले होते. त्यानंतर सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांचा डीपफेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साराचा अर्जुन तेंडुलकरबरोबर असेलला फोटो एडिट करुन शुबमनचा चेहरा लावण्यात आला आहे. 
 

Web Title: Vijay Deverakonda react on Rashmika mandanna deepfake viral video amid rumors of affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.