अफेअरच्या चर्चांदरम्यान विजय देवराकोंडाने शेअर केला रश्मिका मंदानाबरोबरचा फोटो, म्हणाला, “आज खूप...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 18:11 IST2023-08-15T18:10:51+5:302023-08-15T18:11:18+5:30
विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.

अफेअरच्या चर्चांदरम्यान विजय देवराकोंडाने शेअर केला रश्मिका मंदानाबरोबरचा फोटो, म्हणाला, “आज खूप...”
गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या रिलेशनशिपबाबत दोघांनाही अद्याप कोणतंही भाष्य केलेलं नाही. पण, अफेअरच्या चर्चांदरम्यानच आता विजय देवराकोंडाच्या एका फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
विजय देवराकोंडाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तो अभिनेत्री रश्मिका मंदानाबरोबर दिसत आहे. याबरोबरच दिग्दर्शक परशुरामही रश्मिका आणि विजय देवराकोंडाबरोबरच्या या फोटोमध्ये आहेत. ‘गीता गोविंदम’ या चित्रपटाला पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजयने ही पोस्ट केली आहे. या फोटोला त्याने “आज खूप काही घडलं आहे. सगळ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा. गीता गोविंदमला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत म्हणून यांच्याबरोबर हा फोटो. खुशी या कॉन्सर्टसाठी तयार आहे”, असं कॅप्शन दिलं आहे. विजयने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.
‘गदर २’च्या यशानंतर ‘गदर ३’ येणार? सनी देओलच्या चित्रपटाबाबत दिग्दर्शक म्हणाले...
दरम्यान, ‘गीता गोविंदम’ चित्रपटात रश्मिका आणि विजय एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसले होते. २०१८ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट खूप गाजला होता. परशुराम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटातील रश्मिका आणि विजय देवराकोंडाची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांना भावली होती.