'महाराजा' आवडला? मग विजय सेतुपतीचा 'हा' सिनेमा पाहाच, ओटीटीवर झालाय प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:56 IST2025-01-20T12:54:53+5:302025-01-20T12:56:47+5:30
विजय सेतुपतीचा एक सिनेमा आहे, जो सध्या चर्चेत आला आहे.

'महाराजा' आवडला? मग विजय सेतुपतीचा 'हा' सिनेमा पाहाच, ओटीटीवर झालाय प्रदर्शित
Vijay Sethupathi : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. इंडस्ट्रीमध्ये आपल्या हटके अंदाजाने त्याने चांगलीच ओळख निर्माण केली आहे. अलिकडेच त्याच्या महाराजा' सिनेमाने सगळीकडे धुमाकूळ घातला होता. सध्या असाच त्याचा एक सिनेमा आहे, जो चर्चेत आला आहे.
विजयचा राजकीय गुन्हेगारी थ्रिलर चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. हा एक अॅक्शन ड्रामा आहे. 'Viduthalai 2'असं या सिनेमाचं नाव आहे. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तर बॉक्स ऑफिसवरही या सिनेमानं चांगली कमाई केली होती. आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर ऑनलाइन स्ट्रीम झाला आहे. हा चित्रपट १९ जानेवारीपासून प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे.
'Viduthalai 2' हा सिनेमा हिंदीमध्ये पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर मात्र तुमची निराशा होऊ शकते. कारण निर्मात्यांनी तो सध्या फक्त तमिळ भाषेत प्रदर्शित केला आहे. दरम्यान, 'Viduthalai 2' चित्रपटाचा पहिला भागदेखील प्राइम व्हिडिओवर देखील उपलब्ध आहे. 'Viduthalai 2' हा २० डिसेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.