What! पुन्हा बदलली 'पुष्पा २'ची रिलीज डेट, ट्रेलरसंदर्भात मोठी अपडेट आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 11:37 AM2024-10-17T11:37:54+5:302024-10-17T11:38:36+5:30

Pushpa 2 Movie : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अभिनीत 'पुष्पा २'ची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. २०२१ साली तेलगू भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

What! The release date of 'Pushpa 2' has changed again, a big update has come out regarding the trailer | What! पुन्हा बदलली 'पुष्पा २'ची रिलीज डेट, ट्रेलरसंदर्भात मोठी अपडेट आली समोर

What! पुन्हा बदलली 'पुष्पा २'ची रिलीज डेट, ट्रेलरसंदर्भात मोठी अपडेट आली समोर

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) अभिनीत 'पुष्पा २'(Pushpa 2 Movie)ची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. २०२१ साली तेलगू भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा हा पहिला चित्रपट होता, जो पॅनने रिलीज केला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. जेव्हा पासून या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची पुष्पा द रुलची घोषणा झाली आहे, तेव्हापासून चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. मात्र काहीना काही कारणामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ चित्रपटाची रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे.

सुकुमारच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला चित्रपट पुष्पा द रुल या वर्षी ६ डिसेंबर, २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर विकी कौशल आणि रश्मिका मंदाना अभिनीत छावासोबत टक्कर होणार होती. आता सियासत डेलीच्या वृत्तानुसार, पुष्पा द रुलच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे.

'पुष्पा २' या दिवशी भेटीला

रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी अल्लू अर्जुनचा हा चित्रपट ६ डिसेंबरला नाही तर ५ डिसेंबरला पॅन इंडिया रिलीज करणार आहे. या रिपोर्टमध्ये दावादेखील केला आहे की, निर्मात्यांनी पुष्पा २चा स्पेशल प्रीमियर करण्याची योजना आखली आहे. जे मुंबईत ४ डिसेंबर रात्री ९.३० वाजता होण्याची शक्यता आहे. कारण साउथमध्ये अल्लू अर्जुनचे चांगलेच फॅन फॉलोव्हर्स आहेत. जे पाहून तिथेही रात्री १ वाजता स्पेशल प्रीमियर शो असणार आहे. मात्र निर्मात्यांनी अद्याप प्रीमियरच्या बदललेल्या या रिलीज डेटला दुजोरा दिलेला नाही.

हैदराबादमध्ये नाही तर या शहरात रिलीज होईल ट्रेलर?
पुष्पा २च्या रिलीज डेटच्या झालेल्या बदलाबद्दल नाही तर सिनेमाच्या ग्रॅण्ड ट्रेलर लॉंचसंदर्भात अपडेट समोर आली आहे. ज्याचा चाहते बऱ्याच दिवसापासून वाट पाहत आहेत. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचा ट्रेलर लाँच यावेळी हैदराबादमध्ये नाही तर मायानगरी मुंबईत होण्याची शक्यता आहे. पुष्पा २चा ट्रेलर लाँच मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. तेलगू भाषेत बनलेला हा अॅक्शन ड्रामा सिनेमा स्टारकास्टबद्दल सांगायचं तर यात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना शिवाय फहाद फासिल, जगदीश प्रताप भंडारी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
 

Web Title: What! The release date of 'Pushpa 2' has changed again, a big update has come out regarding the trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.