बदला घेण्यासाठी 'रॉकी भाई' परतणार? KGF 3 संदर्भात यशने दिली मोठी अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 18:11 IST2024-10-23T18:09:55+5:302024-10-23T18:11:04+5:30
साउथ सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता यशने 'KGF 3' संदर्भात एक अपडेट शेअर केली आहे.

बदला घेण्यासाठी 'रॉकी भाई' परतणार? KGF 3 संदर्भात यशने दिली मोठी अपडेट
प्रशांत नील (Prashant Neel) दिग्दर्शित 'KGF' या ॲक्शन हिट चित्रपटातील अभिनयासाठी साउथ सिनेइंडस्ट्रीतला अभिनेता यशला खूप प्रेम मिळाले. या फ्रँचायझीच्या बहुप्रतिक्षित सीक्वल 'KGF 3'ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यशने शेअर केले की 'KGF 3' नक्कीच बनणार आहे, ज्यामध्ये तो 'रॉकी भाई'च्या भूमिकेत दिसणार आहे.
नुकत्याच झालेल्या एका संवादात यशने पुष्टी केली की तिसरा भाग बनवण्यासाठी तो प्रशांतसोबत चर्चा करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याने खुलासा केला की सध्या तो गीतू मोहनदासच्या 'टॉक्सिक'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो म्हणाला, 'मी वचन देतो, आम्ही यावर बोलत राहू. आमच्याकडे एक कल्पना आहे. त्यामुळे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.’’
'KGF 3' अजून चांगला करण्याचा करणार प्रयत्न
रिपोर्टनुसार, अभिनेत्याने असेही सांगितले की निर्मात्यांना हे सुनिश्चित करायचे आहे की चित्रपट चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करेल कारण पात्र आणि चित्रपट दोघांनाही खूप प्रेम मिळाले आहे. यावेळी आपण काहीतरी मोठे आणू.
'KGF: Chapter 2' ठरला होता सुपरहिट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुकत्याच झालेल्या संवादात यशने पुष्टी केली की त्याने रणबीर कपूर स्टारर 'रामायण'मध्ये रावणाची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, या चित्रपटाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 'KGF: Chapter 2' या चित्रपटात अभिनेत्री श्रीनिधी शेट्टीही मुख्य भूमिकेत होती.