Prakash Raj : PM मोदींच्या 20 फोटोंचा कोलाज पोस्ट करत प्रकाश राज यांचा टोला; म्हणाले, "ड्रेसिंगचा अतिरेक म्हणजे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 04:41 PM2022-12-05T16:41:55+5:302022-12-05T16:42:56+5:30

Prakash Raj : होय, प्रकाश राज यांनी ट्विटरवर मोदींच्या वेगवेगळ्या पारंपारिक वेशभूषेतील  फोटो शेअर करत एक उपरोधिक ट्वीट केलं आहे.  

south star Prakash Raj commented on PM Modi clothes trolled badly | Prakash Raj : PM मोदींच्या 20 फोटोंचा कोलाज पोस्ट करत प्रकाश राज यांचा टोला; म्हणाले, "ड्रेसिंगचा अतिरेक म्हणजे..."

Prakash Raj : PM मोदींच्या 20 फोटोंचा कोलाज पोस्ट करत प्रकाश राज यांचा टोला; म्हणाले, "ड्रेसिंगचा अतिरेक म्हणजे..."

googlenewsNext

साऊथचे दिग्गज अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj ) आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतातच. पण त्याहीपेक्षा अधिक त्यांच्या ट्वीटमुळे त्यांची चर्चा होताना दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी प्रकाश राज सोडत नाहीत. आता प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधत, त्यांची खिल्ली उडवली आहे.
होय, प्रकाश राज यांनी ट्विटरवर मोदींच्या वेगवेगळ्या पारंपारिक वेशभूषेतील  फोटो शेअर करत एक उपरोधिक ट्वीट केलं आहे.  

प्रकाश राज यांनी नरेंद्र मोदी यांचे वेगवेगळ्या पेहरावातील 20 फोटोंचा कोलाज शेअर केला आहे.  यापैकी अनेक फोटोंमध्ये मोदींनी डोक्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या घातलेल्या आहेत किंवा वस्त्रं गुंडाळलेली आहेत. ‘ओव्हर ड्रेसिंग (अती कपडे परिधान करणे), नग्नता (न्यूडीटी) झाकण्याची नवी पद्धत...,’अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे.

झाले ट्रोल
अपयश झाकणे या अर्थाने प्रकाश राज यांनी ‘न्यूडीटी’ हा शब्द वापरला आहे. पण त्यांनी वापरलेल्या या शब्दावर अनेकांनी आक्षेप घेतला घेत त्यांना जबरदस्त ट्रोल करायला सुरूवात केली. ‘मतलब कुछ भी लिख रहे हो,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. जेव्हा मेंदूत अंधार असेलत तर नाम प्रकाश राज असल्यानं काहीही फरक पडत नाही, अशा शब्दांत एका युजरने त्यांना सुनावलं आहे.  काही युजर्सनी प्रकाश राज यांच्या चित्रपटातील सीनमधील फोटो व मीम्स शेअर करत त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय.
 
अनेक लोक माझ्यासोबत काम करायला तयार नाहीत...
प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा त्यांनी मोदींवर टीका केली आहे. यामुळे अनेकदा ते ट्रोलही होतात. अलीकडे एका मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं होतं.  माझ्या राजकीय विचारधारेचा आता माझं काम आणि माझ्या नातेसंबंधांवर परिणाम होऊ लागला आहे, असं ते म्हणाले होते. काही लोक आता माझ्यासोबत काम करू इच्छित नाही. माझ्यासोबत काम करू नका म्हणून त्यांना कुणी थांबवलेलं नाही. तर ते घाबरतात. माझ्यासोबत काम केल्यानं काही विशिष्ट लोक दुखावले जातील, याची त्यांना भीती आहे. अर्थात यामुळे मला जराही फरक पडत नाही. मी इतका बलवान व श्रीमंत आहे की, मी सगळं काही सहन करू शकतो, असं प्रकाश राज म्हणाले होते.

Web Title: south star Prakash Raj commented on PM Modi clothes trolled badly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.