Junior NTR : ११०० कोटी रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे Jr NTR, लग्नात केला होता १०० कोटी खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 04:34 PM2022-02-07T16:34:32+5:302022-02-07T16:35:21+5:30
Junior NTR Facts: ज्यूनिअर एनटीआर जो आगामी RRR सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. पण आज आम्ही तुम्हाला RRR बाबत नाही तर ज्यूनिअर एनटीआरबाबत काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहोत.
Junior NTR Facts: साऊथ इंडियन सिनेमातील स्टार्सची लोकप्रियता आता केवळ साऊथपर्यंतच मर्यादीत राहिलेली नाही. ते वेगाने पॅन इंडिया स्टार बनत आहेत. असाच एका स्टार आहे ज्यूनिअर एनटीआर जो आगामी RRR सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. पण आज आम्ही तुम्हाला RRR बाबत नाही तर ज्यूनिअर एनटीआरबाबत काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहोत.
तेलुगू फिल्म इंडस्ट्रीचा उल्लेख आला आणि ज्यूनिअर एनटीआरची चर्चा झाल नाही असं होणार नाही. त्याचा जन्म हैद्राबादमध्ये १९८३ मध्ये झाला होता. त्याने १० वर्षांचा असताना सिनेमात काम करण्यास सुरूवात केली आणि आज तो टॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे. ज्यूनिअर एनटीआरने बालकलाकार म्हणून ब्रम्हश्री विश्वामित्र सिनेमात काम केलं होतं. हा सिनेमा त्याचे आजोबा एनटी रामाराव यांनी बनवला होता. ज्यूनिअरचं खरं नाव तारक आहे. त्याच्या आजोबाने ते बदललं.
ज्यूनिअर एनटीआरच्या पर्सनल लाइफबाबत सांगायचं तर त्याने २०११ मध्ये लक्ष्मी प्रनाथी नावाच्या तरूणीसोबत लग्न केलं. लक्ष्मी प्रसिद्ध बिझनेसमन श्रीनिवास राव यांची मुलगी आहे. या दोघांचं लग्न साऊथ इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या लग्नात साधारण १०० कोटी रूपये खर्च करण्यात आला होता. मीडिया रिपोर्टनुसार, लग्नात लक्ष्मीने जी साडी नेसली होती त्याची किंमत १ कोटी रूपये होती.
इतकंच नाह तर लग्नाच्या सजावटीवरच १८ कोटी रूपये खर्च करण्यात आला होता. लग्नात साधारण १५ हजार लोक आले होते. ज्यातील १२ हजार केवळ ज्यूनिअर एनटीआरचे फॅन्सच होते. ज्यूनिअर एनटीआर लॅव्हिश लाइफ जगण्यासाठी प्रसिद्ध आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती साधारण ११०० कोटी रूपयांच्या आसपास आहे.