"नवीन दिग्दर्शक अन् कलाकारांसोबत काम करणार नाही" असं का म्हणाला विजय देवरकोंडा?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 10:57 AM2024-04-02T10:57:22+5:302024-04-02T10:57:51+5:30
विजयने यामागचं कारण समजावून सांगितलं आहे.
साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. 'अर्जुन रेड्डी' सिनेमामुळे त्याला जोरदार यश मिळालं. शिवाय 'गीता गोविंदम', 'डिअर कॉम्रेड' हे सिनेमेही गाजले. आता विजयचा 'द फॅमिली स्टार' हा सिनेमा रिलीज होणार आहे. मृणाल ठाकूरसोबत त्याची जोडी जमली आहे. नुकतंच विजयने सिनेमाच्या प्रमोशननिमित्त झालेल्या मुलाखतीत एक वक्तव्य केलं जे चर्चेत आहे.
विजय देवरकोंडा Glitz ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, "मी कोणत्या नवीन कलाकारासोबत आणि नवीन दिग्दर्शकासोबत काम करणार नाही. त्यांनी किमान एक तरी सिनेमा केलेला असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही सरळ सेटवर येता तेव्हा याचा स्वीकार करणं आव्हानात्मक असतं. बजेट सांभाळण्याचाही दबाव असतो. स्केल बघणंही महत्वाचं असतं. एक सिनेमा केल्यानंतर तुम्हाला या गोष्टीची सवय होते."
तो पुढे म्हणाला, "आपण सगळेच एका नंतर एक फिल्ममधून स्वत:मध्ये सुधारणा करत असतो. ही एक प्रॅक्टिस मॅच किंवा वॉर्मअप आहे. त्यामुळेच त्यांनी वॉर्मअप केलेलं असलं पाहिजे आणि ते माझ्यासाठी तयार असले पाहिजेत. कारण जेव्हा मी येतो तेव्हा पूर्ण तयारीने येतो. ते माझं शोषण करण्यासाठी पूर्ण तयार असले पाहिजेत. म्हणूनच मी नवीन कलाकार आणि दिग्दर्शकांसोबत काम करत नाही."