'सोयरे सकळ' ठरले सर्वोत्कृष्ट नाटक, सुमित राघवन सर्वोत्कृष्ट अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 05:07 PM2019-06-05T17:07:44+5:302019-06-05T17:08:55+5:30
‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार सोहळा १४ जून २०१९ रोजी सायंकाळी ०६.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून कमलाकर नाडकर्णी आणि दया डोंगरे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा १४ जून २०१९ रोजी सायंकाळी ०६.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. दरवर्षी ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद’ रंगकर्मींना नाटककार गोविंद बल्लाळ देवल स्मृतिदिनाप्रित्यर्थ १४ जून रोजी पुरस्कार देऊन सन्मानित करते.
पुरस्कारांची यादी पुढीलप्रमाणेः
सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक - ‘सोयरे सकळ’ (भद्रकाली प्रॉडक्शन्स)
सर्वोत्कृष्ट लेखक (व्यावसायिक नाटक)
डॉ. समीर कुलकर्णी (सोयरे सकळ)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार
मंगेश कदम (गुमनाम है कोई!)
सर्वोत्कृष्ट अभिनेता
सुमित राघवन (हॅम्लेट)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
ऐश्वर्या नारकर (सोयरे सकळ)
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार
प्रदीप मुळ्ये (हॅम्लेट)
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना
प्रदीप मुळ्ये (गुमनाम है कोई!)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
अजित परब (सोयरे सकळ)
सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार
सचिन वारीक (सोयरे सकळ)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
सतीश राजवाडे (अ परफेक्ट मर्डर)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
माधुरी गवळी (एपिक गडबड)
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता
आशिष पवार (गलती से मिस्टेक)
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री
नंदिता पाटकर (आमच्या ‘ही’च प्रकरण)
विशेष लक्षवेधी पुरस्कार
मधुरा वेलणकर (गुमनाम है कोई!)
सर्वोत्कृष्ट व्यावसायिक संगीत नाटक
‘संगीत चि.सौ.कां. रंगभूमी’ (नाट्यसंपदा कला मंच)
सर्वोत्कृष्ट गायक
विक्रांत आजगावकर (संगीत संत तुकाराम)
सर्वोत्कृष्ट गायिका
शमिका भिडे (संगीत चि.सौ.कां. रंगभूमी)
सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्था
आविष्कार, मुंबई
प्रायोगिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक
प्रदीप वैद्य (काजव्यांचा गाव)
सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक
प्रभाकर (गोट्या सावंत)
नाट्यसमीक्षक
क्षितीज झारापकर (वृत्तपत्र- सामना)
लोककलावंत पुरस्कार
नंदेश उमप
बालरंगभूमीवरील उल्लेखनीय कार्य
राधिका इंगळे (पुणे)
निवेदक
श्रीकांत गायकवाड (नाशिक)
सर्वोत्कृष्ट एकपात्री
डॉ. दिलीप अलोणे (यवतमाळ)
नाट्यपरिषद कार्यकर्ता
प्रफुल्ल कारेकर (बोरीवली) व भालचंद्र चितळे (सांगली)
गुणी रंगमंच कामगार पुरस्कार
विलास हुमणे (मुंबई)
कामगार रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक
श्याम उर्फ अनंत पेठकर (नागपूर) (तेरवं)
रंगभूमी व्यतिरिक्त केलेल्या विधायक कार्य
विश्वास ठाकुर (नाशिक) आणि वैशाली राजशेखर (कोल्हापूर)
कै. रमेश भाटकर स्मरणार्थ
उत्कृष्ट अभिनय उमेश कामत (दादा, एक GOOD NEWS आहे)
सर्वोत्कृष्ट रंगमंच कामगार प्रकाश परब (मुंबई)
रंगभूमी सेवा बाळु वासकर (मुंबई)