हर्षवर्धनला शुभेच्छा देण्यासाठी अवतरली स्पेशल व्यक्ती!

By Admin | Published: September 17, 2016 01:36 AM2016-09-17T01:36:48+5:302016-09-17T01:36:48+5:30

कोणत्याही कलाकारासाठी त्याचा पहिला सिनेमा हा विशेष असतो. त्यात एखादा स्टार पुत्र किंवा कन्या असेल, तर त्यावर जगाच्या नजरा असतात.

Special person for Harsh Vardhan to be happy! | हर्षवर्धनला शुभेच्छा देण्यासाठी अवतरली स्पेशल व्यक्ती!

हर्षवर्धनला शुभेच्छा देण्यासाठी अवतरली स्पेशल व्यक्ती!

googlenewsNext

कोणत्याही कलाकारासाठी त्याचा पहिला सिनेमा हा विशेष असतो. त्यात एखादा स्टार पुत्र किंवा कन्या असेल, तर त्यावर जगाच्या नजरा असतात. असंच काहीसं दृश्य पाहायला मिळालं ‘मिर्झिया’ सिनेमाच्या म्युझिक लाँचला... या वेळी अभिनेता हर्षवर्धन कपूरसाठी साऱ्या कपूर कुटुंबीयांनी फॅमिली पॉवर दाखवली. या वेळी सारं कपूर खानदान हर्षवर्धनच्या नव्या इनिंगला शुभेच्छा देण्यासाठी हजर होतं. यांत पापा अनिल कपूर, आई सुनीता कपूर, बहीण सोनम आणि रिया तसंच काका बोनी कपूर, संजय कपूर, श्रीदेवी, महीप कपूर, मोहित मारवाह सारेच उपस्थित होते. मात्र, सगळ्यांमध्ये साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं एका खास व्यक्तीनं. ही खास व्यक्ती म्हणजे हर्षवर्धन कपूरची आजी निर्मला कपूर. आपल्या लाडक्या नातवाच्या नव्या इनिंगला शुभेच्छा देण्यासाठी निर्मला कपूर व्हीलचेअरवरून या सोहळ्यात उपस्थित होत्या. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी ‘मिर्झिया’ या सिनेमातून हर्षवर्धन रुपेरी पडद्यावर एंट्री मारतोय.
७ आॅक्टोबरला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय.
लेकाचं कौतुक करताना
गहिवरला अनिल
- ‘मिर्झिया’ सिनेमातून अभिनेता हर्षवर्धन कपूर रुपेरी पडद्यावर एंट्री मारतोय. या सिनेमाच्या म्युझिक लाँचच्या निमित्ताने हर्षवर्धन पहिल्यांदाच मीडियासमोर आला. या वेळी हर्षवर्धनच्या नव्या इनिंगला शुभेच्छा देण्यासाठी सगळं कपूर खानदान आणि अवघं बॉलिवूडच अवतरलं होतं. कपूर कुटुंबीयांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हर्षवर्धनच्या नव्या इनिंगचा आनंद पाहायला मिळत होता. मात्र, सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या त्या झक्कास स्टार अभिनेता आणि हर्षवर्धनचे वडील अनिल कपूरवर. लाडकी लेक सोनमनंतर हर्षवर्धन नवी इनिंग सुरू करीत असल्याचा आनंद अनिल कपूर यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता. या वेळी अनिल कपूर यांनी झक्कास स्टाईलनं आपल्या लेकाचं कौतुक केलं. मात्र, कौतुक करता-करता त्यांच्यातला पिता जागा झाला. आपल्या लाडक्या लेकाचं कौतुक करताना ते थकत नव्हते. अनिल कपूर यांच्या बोलण्यात आपल्या लेकाबद्दलचा अभिमान जाणवत होता. त्याच वेळी या बापमाणसाला गहिवरून आलं आणि त्यांच्या डोळ्यांतून टचकन् पाणी आलं. आपल्या लेकाबद्दलचा हा अभिमान आणि आनंदाश्रू अनिल कपूर या वेळी काही केल्या लपवू शकले नाहीत. लेकानंही रसिकांचं प्रेम मिळवून अभिनयाच्या प्रांतात नवनवीन शिखरं गाठावीत, अशीच काहीशी भावना या पित्याच्या मनात दाटून आली असावी.
सिनेमाच माझं भविष्य ठरवतील : हर्षवर्धन
- अभिनेता अनिल कपूर आणि त्यांची लेक सोनम कपूर यांनी अभिनयाच्या क्षेत्रात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय. गेल्या अनेक दशकांपासून अनिल कपूर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून, आजही त्यांची जादू कायम आहे. सोनमनंही तिच्या अभिनयानं जम बसवण्यास सुरुवात केलीय. आता कपूर खानदानातील आणखी एक जण आपल्या अभिनयानं रसिकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झालाय. अनिल कपूर यांचा लेक हर्षवर्धन कपूर ‘मिर्झिया’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री मारतोय. मात्र, पापा अनिल कपूर आणि बहीण सोनम कपूर यांचा वारसा समर्थपणे चालवण्याचा दबाव त्याच्यावर आहे. अनिल कपूर यांच्याप्रमाणेच हर्षवर्धननंही करियरमध्ये नवी उंची गाठावी अशा फॅन्सच्या अपेक्षा आहेत. मात्र, आपल्यावर कोणत्याही गोष्टीचं दडपण नसल्याचं हर्षवर्धननं म्हटलंय. आपल्याला करिअरमध्ये विविध विषय असलेले सिनेमा करायचे असून, त्यातून मला माझी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची आहे, असं हर्षवर्धननं म्हटलंय.
छे:! दडपण... ते काय असतं ?
- हिंदी चित्रपटसृष्टीत बापलेकाच्या अनेक जोड्या आहेत. वडिलांनी चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर लेकानंही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चित्रपटसृष्टी गाजवलीय. यांत आणखी एका बापलेकाच्या जोडीचा समावेश होतोय. ही जोडी म्हणजे अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर. अनिल कपूर यांच्याप्रमाणेच हर्षवर्धननंही बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान आणि ओळख निर्माण करावी, असं फॅन्सना वाटतंय. मात्र, फॅन्सच्या या अपेक्षांचं ओझं हर्षवर्धननं घेतलेलं नाही. कोणत्याही प्रकारचं दडपण आपल्यावर नसल्याचं हर्षवर्धनला वाटतंय. प्रत्येक गोष्ट कशी घडते यावर बरंच काही अवलंबून असतं, असं त्याला वाटतं. प्रत्येक गोष्टीचे चांगले-वाईट परिणाम असतात. त्यामुळे पापा अनिल कपूर यांच्या नावाचं आणि त्यांच्याभोवती असलेल्या वलयाचं दडपण वाटत नसल्याचंही हर्षवर्धनं स्पष्ट केलंय.

Web Title: Special person for Harsh Vardhan to be happy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.