"उत्स्फूर्त दाद, शाबासकीनं आमची दिवाळी निघाली उजळून", मुख्यमंत्र्यांनी दाद दिल्यानंतर मधुराणीची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 05:51 PM2023-11-13T17:51:18+5:302023-11-13T17:51:41+5:30

ठाण्यात दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात समीर चौघुले आणि आई कुठे काय करते फेम मधुराणी गोखलेने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आई कुठे काय करते मालिकेला दाद दिली.

"Spontaneous applause, our Diwali has lit up with a bang", Madhurani's special post after the Chief Minister's appreciation | "उत्स्फूर्त दाद, शाबासकीनं आमची दिवाळी निघाली उजळून", मुख्यमंत्र्यांनी दाद दिल्यानंतर मधुराणीची खास पोस्ट

"उत्स्फूर्त दाद, शाबासकीनं आमची दिवाळी निघाली उजळून", मुख्यमंत्र्यांनी दाद दिल्यानंतर मधुराणीची खास पोस्ट

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेच्या कथानक आणि पात्रांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. दरम्यान ठाण्यात दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात समीर चौघुले आणि आई कुठे काय करते फेम मधुराणी गोखलेने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आई कुठे काय करते मालिकेला दाद दिली. त्यानंतर फोटो शेअर करत मधुराणीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

मधुराणी प्रभुलकर हिने दिवाळी पहाट कार्यक्रमातला फोटो शेअर करत लिहिले की, आजच्या 'रंगाई दिवाळी पहाट'ला खुद्द महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपस्थित होते .त्यांच्या समोर कविता ऐकवल्या , गझल गायली आणि त्यांची उत्स्फूर्त दाद आणि शाबासकी ह्यांनी आमची दिवाळी अक्षरशः उजळून निघाली. ( कवितेचे आणि गाण्याचे व्हिडीओ लवकरच टाकते.)

एकनाथ शिंदे म्हणाले...
एकनाथ शिंदे हे मधुराणी प्रभुलकरला म्हणाले, "आई कुठे काय करते आपला कार्यक्रम अतिशय उत्तम सुरू आहे. श्रीकांतची आई (लता शिंदे) सुद्धा हा कार्यक्रम पाहताना मीदेखील कधी कधी पाहायचो. तुमची भूमिकाही उत्तम होती. तुमच्या विरोधातील भूमिका चांगली नव्हती. म्हणजे त्यांना जो रोल दिला तो त्यांनी केला. शेवटी पुरुषपण आमचे चांगले असतात."

मालिकेबद्दल..
आई कुठे काय करते मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. यशने आरोहीकडे प्रेमाची कबुली दिली आहे आणि त्याच्या घरातल्यांनाही सांगितलं आहे. याला कांचन आजीचा विरोध आहे. त्यात आजी आरोहीला बोलून एक घटस्फोटीत व्यक्तीचं स्थळ आणते. मात्र त्यानंतर यश मला आरोहीशी लग्न करायचे असल्याचे सांगतो. त्याच्या या निर्णयाला अरुंधतीचा पाठिंबा आहे. मात्र या निर्णयाला अनिरुद्ध आणि कांचन आजीचा विरोध आहे. त्यामुळे यशला आरोही 
लग्नासाठी होकार देणार का आणि घरातलेही आरोहीला सून म्हणून स्वीकारतील का, हे पाहणे कमालीचं ठरणार आहे.
 

Web Title: "Spontaneous applause, our Diwali has lit up with a bang", Madhurani's special post after the Chief Minister's appreciation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.