हे असणार बिग बॉस १२ चे स्पर्धक, हा क्रिकेटर जाणार बिग बॉसच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 11:31 AM2018-09-06T11:31:08+5:302018-09-06T16:52:54+5:30
बिग बॉस मधील स्पर्धकांचं वागणं, शोमधील अश्लीलता यावरून या शोची कायमच चर्चा झाली. त्यामुळे प्रत्येक सिझनला कोणते सेलिब्रेटी या घरात एंट्री घेणार याचीही उत्सुकता पाहायला मिळते.
छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉसचा १२ वा सिझन लवकरच सुरू होणार आहे. सगळ्यात वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. स्पर्धकांचं वागणं, शोमधील अश्लीलता यावरून या शोची कायमच चर्चा झाली. त्यामुळे प्रत्येक सिझनला कोणते सेलिब्रेटी या घरात एंट्री घेणार याचीही उत्सुकता पाहायला मिळते. नेहमीप्रमाणे यावेळी बिग बॉसचा १२ सिझनमध्ये अनेक सेलिब्रेटींच्या नावाची चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमात क्रिकेटर श्रीसंत हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे.
मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे श्रीसंत हे नाव चांगलेच चर्चेत आले होते. यासोबतच उतरण या मालिकेमुळे नावारूपाला आलेली टिना दत्ता, देबिना बॅनर्जी, दीपिका कक्कर, सृष्टी रोडे, नेहा पेंडसे, रिधिमा पंडित यांसारखे कलाकार या सिझनमध्ये हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे.
बिग बॉसचा १२ वा सिझन १६ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या शोचा लॉचिंग सोहळा गोव्यात पार पडला. सलग नवव्या सिझनचा होस्ट म्हणून परत येण्याविषयी बोलताना, सुपरस्टार सलमान खानने सांगितले, “बिग बॉस या कार्यक्रमाकडे देश तर अपेक्षेने पाहतोच आहे पण मी सुद्धा त्याच समान उत्सुकतेच्या अपेक्षने पाहतोय. जरी मी आठ वर्षांपासून या कार्यक्रमाचे होस्टिंग करत असलो तरी प्रत्येक वेळी मला त्यातून नवीन अनुभव मिळतो आणि मी काही नवीन संबंध जोडतो. विचित्र जोडी ही संकल्पना अतिशय विलक्षण आहे आणि आम्ही निवडलेल्या अफाट जोड्या प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करतील. या जोड्या एकमेकांच्या सोबत आहेत की कठीण काळात त्यांच्यात कटुता निर्माण झाली आहे हे पाहणे गंमतीदार असणार आहे.”
बिग बॉस या कायक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट झाले आहेत. या कार्यक्रमाच्या गेल्या सिझनची विजेती शिल्पा शिंदे ठरली होती. यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक एकटे नसून जोड्यांमध्ये येणार आहेत. ही जोडी पती-पत्नी, मुलगा-मुलगी कोणाचीही असू शकते. बिग बॉस १२ आता जोडीची संकल्पनाच बदलण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण त्यांची थीमच आहे विचित्र जोड्या. सासू-सून, मामा-भाचा, मालक-नोकर अशा विविध जोड्या या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.