VIDEO: शाहरुख-श्रीदेवीचा सेटवरचा २२ वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल, एकदाच एकत्र केलं होतं काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 04:48 PM2018-08-11T16:48:04+5:302018-08-11T16:51:05+5:30

जी बोलते कमी आणि काम जास्त करते असं श्रीदेवींबाबत म्हटलं जायचं. अशातच त्यांचा आणि बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा एक २२ वर्ष जुना व्हिडीओ समोर आलाय.

Sridevi and Shahrukh Khan army movie shooting video viral | VIDEO: शाहरुख-श्रीदेवीचा सेटवरचा २२ वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल, एकदाच एकत्र केलं होतं काम!

VIDEO: शाहरुख-श्रीदेवीचा सेटवरचा २२ वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल, एकदाच एकत्र केलं होतं काम!

googlenewsNext

मुंबई : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना जाऊन आता काही महिने झाले तरी त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींविषयींच्या चर्चा अजूनही सुरुच आहे. त्यांच्याविषयी इतकंकाही आहे की, अजून ते संपत नाहीये. जी बोलते कमी आणि काम जास्त करते असं श्रीदेवींबाबत म्हटलं जायचं. अशातच त्यांचा आणि बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा एक २२ वर्ष जुना व्हिडीओ समोर आलाय.

हा व्हिडीओ शाहरुख खानचा पहिला सिनेमा 'आर्मी'चा आहे. या सिनेमात शाहरुख खान आणि श्रीदेवी यांनी पहिल्यांदा आणि शेवटचं एकत्र काम केलं होतं. आता जो व्हिडीओ समोर आला आहे त्यात शाहरुख आणि श्रीदेवी मेकअप करताना आणि या सिनेमाबाबत बोलताना दिसत आहे. 

या सिनेमानंतर श्रीदेवी आणि शाहरुख कधीही एकत्र दिसले नाहीत. 'आर्मी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नव्हता. या सिनेमानंतर श्रीदेवी यांना शाहरुखसोबत आणखी दोन सिनेमे ऑफर झाले होते. पण त्यांनी काम करण्यास नकार दिला होता. 
अब्बास-मस्तान यांच्या 'बाजीगर' मध्ये श्रीदेवी डबल रोल साकारणार होत्या. पण मेकर्सना वाटलं की, जर शाहरुख खान सिनेमात एकीला मारेल जर दर्शकांची सहानुभूती हिरोला मिळणार नाही. त्यानंतर या सिनेमातील रोल पुन्हा लिहिण्यात आले. आणि दोन नवीन चेहरे शिल्पा शेट्टी आणि काजोल यांना कास्ट केलं गेलं. 

श्रीदेवी यांना ऑफर झालेला दुसरा सिनेमा म्हणजे 'डर'. हा सिनेमा श्रीदेवी यांनी स्वत: रिजेक्ट केला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, 'चांदनी आणि लम्हे सारखे सिनेमे केल्यानंतर 'डर'मध्ये मला माझा रोल काही खास वाटला नाही. जर मला शाहरुखचा रोल मिळाला असता तर मी हा सिनेमा नक्की केला असता. 

Web Title: Sridevi and Shahrukh Khan army movie shooting video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.